- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विस्तार अधिकाऱ्याने ग्रामसेविकेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यात उघडकीस आला आहे.यानंतर पंचायत समिती कार्यालयात तोंडावर शाई टाकत संतप्त महिला ग्रामसेविकेने विस्तार अधिकाऱ्याला चांगलेच बदडवले आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिंदखेडा येथील विस्तार अधिकारी एस.के.सावकारे याने ग्रामसेविका महिलेचा विनयभंग करून त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. शिंदखेडा पंचायत समितीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.यानंतर संतप्त महिला ग्रामसेविका आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखाने विस्तार अधिकाऱ्याला काळे फासत चांगलाच चोप दिला. यानंतर पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली.
- Advertisement -