Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे घुमजाव सत्र…-तरच मी उमेदवारी...

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे घुमजाव सत्र…-तरच मी उमेदवारी अर्ज भरेल….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- गडचिरोली जागा लढण्याबाबत सतत आग्रही असलेले,भाजपची कोंडी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आता घुमजाव केले आहे. पक्षाने आदेश दिला तरच लढणार, अन्यथा महायुतीच्या उमेदवारासाठी काम करणार असा सावध पवित्रा त्यांनी घेतला आहे.ते आज दि.२३ रोजी विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

गडचिरोलीचे तिकीट अद्याप जाहीर झालेले नाही, त्यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.आज दि. २३ मार्च रोजी दिल्लीत महायुतीच्या सर्व नेत्यांची बैठक आहे.जो कोणी महायुतीचा उमेदवार राहील त्याला निवडून आणण्याचे काम माझ्या वतीने केले जाईल, असे आत्राम यांनी स्पष्ट केले.वरिष्ठ लोक बोलल्यानंतर मी त्यामध्ये काय बोलणार,सध्या सगळे वरिष्ठ बसले आहेत.जो काही निर्णय होईल, त्या निर्णयाप्रमाणे जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल, त्याला निवडून आणण्याचे काम आपण करू, जे जे उभे राहणारे अपेक्षित उमेदवार आहेत, त्या सगळ्यांनी ठरवले आहे.माझे सुद्धा कागदपत्र तयार आहेत, जर पक्षाचा आदेश आला, तर मी उमेदवारी अर्ज भरेल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!