Wednesday, July 22, 2026
Homeगडचिरोलीअनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरूणांसाठी 'स्टँड अप इंडिया' मार्जिन मनी योजना..-१० टक्के स्वहिस्सा,७५...

अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरूणांसाठी ‘स्टँड अप इंडिया’ मार्जिन मनी योजना..-१० टक्के स्वहिस्सा,७५ टक्के बँक आणि १५ टक्के अनुदान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र नवउद्योजक तरूणांना मार्जीन मनी उपलब्ध करून देणेबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. 

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र १८ वर्षावरील नवउद्योजक तरूणांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास ‘स्टँड अप इंडिया’योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या १५ टक्के अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येईल.सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ८ मार्च,२०१९ व ९ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत.सदरचा शासन निर्णय शासनाच्या WWW.Maharashtra.gov.in संकेतस्तळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. 

गडचिरोली जिल्हयातील पात्र इच्छूक नवउद्योजक तरूणांनी कार्यालय सहायक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,एल.आय.सी.ऑफीस रोड, गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा लाभ घ्यावा; असे आवाहन डॉ.सचिन मडावी,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोली यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात; पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६' अंतर्गत आज,बुधवार २२ जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनाचे तसेच मुख्यमंत्री...

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,बुधवार २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण...

उद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलन प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे.विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद...

देसाईगंजच्या शंकरपुर परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद; तर २० महसुल मंडळात मुसळधार पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल मंगळवारपासून ते आज बुधवार सकाळपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली.अजूनही पाऊस सुरूच आहे.२४ तासात जिल्ह्यात सरासरी ५१.४ मिमी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!