Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोलीअत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा दिली; मात्र आता मानधनाशिवाय...

अत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा दिली; मात्र आता मानधनाशिवाय सेवा देणे अशक्य झाले आहे.. – पेसा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यातील बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)पेसा पदभरतीमधील मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत बिनपगारी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.मागील चार महिन्यांपासून मानधन अदा करण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी सेवा सुरू ठेवली आहे.अश्यातच आरोग्य विभागाच्या १६ मे २०२३ रोजीच्या पदभरती जाहिरातीनुसार अंतिम गुणवत्तेत निवड झालेल्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे १० फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष बाब म्हणून मानधन तत्त्वावर नियुक्त करण्यात आले होते.दरम्यान,सर्वोच्च न्यायालयाने २ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात सदर भरती प्रक्रियेतील ५० टक्के जागा राखीव ठेवून उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य शासनाला निर्देश दिले होते.त्यानुसार राज्य शासनाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन निर्णय काढून पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. मात्र,शासन निर्णय होऊनही अद्याप कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यातच मागील चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.वाढते पेट्रोल दर,खोली भाडे आणि ग्रामीण भागातील कठीण परिस्थितीमुळे सेवा बजावतांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.“अत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा  दिली.मात्र,आता मानधनाशिवाय सेवा देणे अशक्य झाले आहे.त्यामुळे आम्ही बिनपगारी कामबंद आंदोलन करत आहोत,” अशी भूमिका आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.तसेच शासनाने तात्काळ निर्णय घेऊन मानधनावर कार्यरत सर्व बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे व थकीत मानधन त्वरित अदा करावे, अशी मागणी कर्मचारी मयुर कोडापे,निखिल उसेंडी, लोकेश मडावी,लंकेश तुलावी,सुजीतकुमार आतला यांच्यासह पेसा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!