Wednesday, November 18, 2026
Homeगडचिरोलीअतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३८(१)अन्वये हे आदेश जारी केले असून,दिनांक-११ ऑक्टोंबरपासून ते २३ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत लागू राहील.
आदेशानुसार डीजे,प्लाझ्मा सिस्टीम,मॉडिफाइड साउंड इक्विपमेंट,वूफर व सब-वूफर यांसारख्या अतितीव्र ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरास बंदी राहणार आहे.सार्वजनिक ठिकाणी अथवा त्याच्या परिसरात ध्वनीक्षेपक,लाऊडस्पीकर, ॲम्प्लिफायर व इतर ध्वनी उपकरणांच्या वापरासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगी मिळाल्यानंतरही निर्धारित ध्वनीमर्यादा व अटींचे पालन बंधनकारक राहील.
रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनी उपकरणांच्या वापरास सक्त मनाई राहील.जिल्हादंडाधिकाऱ्यांनी विहित केलेले दिवस व वेळ यांना आदेशानुसार अपवाद राहणार आहे.औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ व रात्री ७० डेसिबल,व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ व रात्री ५५ डेसिबल,निवासी क्षेत्रात दिवसा ५५ व रात्री ४५ डेसिबल,तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबल अशी ध्वनीमर्यादा राहील.
ज्येष्ठ नागरिक,लहान मुले,विद्यार्थी व रुग्णांना त्रास होणार नाही आणि सार्वजनिक शांतता भंग होणार नाही,याची आयोजकांनी दक्षता घ्यावी.रुग्णालये,शैक्षणिक संस्था,न्यायालये व अधिसूचित शांतता क्षेत्रांच्या परिसरात लागू निर्बंधांचे काटेकोर पालन करावे.
ध्वनिप्रदूषणाची तक्रार प्राप्त झाल्यास किंवा नियमभंग निदर्शनास आल्यास पोलीस तात्काळ पाहणी करून कायदेशीर कारवाई करतील.उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३६ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाईल.वारंवार उल्लंघन झाल्यास परवानगी रद्द करणे तसेच कलम ७० अन्वये ध्वनीक्षेपकाचे साहित्य जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदारांचा दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात.. -एक महिन्याचे वेतन दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!