Monday, July 13, 2026
Homeलातूरअखेर 'त्या' शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांचा कडकडाट झाला आणि वीज कोसळून त्यांच्या दोन बैलांपैकी एक बैल जागीच ठार झाला होता.शेतीचा मुख्य आधारच हिरावल्याने गायकवाड कुटुंब अडचणीत आले होते.दुसरा बैल खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसे नसल्याने त्यांनी पत्नीच्या मदतीने नांगरणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार,काशिनाथ यांच्या पत्नीने जबाबदारी स्वीकारून नांगराच्या एका बाजूला एक बैल तर एका बाजूला पत्नी औसाबाई नांगर ओढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र डागले होते.आता या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत जिल्हा प्रशासनाला आवश्यक मदतीचे निर्देश दिलेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जवळच्या गोशाळेतून शेतकऱ्याला नांगरणीसाठी बैल उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच नव्याने बैल खरेदी करता यावा यासाठी ३२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे,शेतकरी काशिनाथ गायकवाड हे भूमिहीन शेतमजूर असून ते इतर  शेतकऱ्यांची जमीन कसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.त्यांना दोन मुले व चार मुली अशा सहा अपत्यांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!