- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपला असून २६ नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आज,मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.मात्र,नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत राज्याचा कारभार शिंदेच पाहणार आहेत.काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते नवे सरकार स्थापन होईपर्यंत कारभार सांभाळणार आहेत.नवे
मुख्यमंत्री कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतांना विधानसभेचा पंच वार्षिक कार्यकाळ संपलेला आहे.विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने तांत्रिक बाब म्हणून यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो.मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच विधानसभा बरखास्त होते.तिन्ही
नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली व त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला.शिंदेंनी राजीनामा दिल्याने आता पुढील सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीमध्ये १३२ जागांवर विजय मिळवला असून शिंदेंच्या शिवसेनेने ५७ जागांवर विजय मिळवला आहे.अजित पवारांच्या पक्षाने ४१ जागांवर विजय मिळवला आहे.महायुतीचा मुख्यमंत्री कोण यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी बोलून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन असे एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी
वेळोवेळी सांगितले आहे.दरम्यान आज मुख्यमंत्री
पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे निश्चित
होणार असून उद्या म्हणजेच बुधवारी मुख्यमंत्री पदी
कोण असेल याची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही जोर लावला जात असल्याचे चित्र दिसत आहे.मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच कायम रहावेत असे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मागील दोन दिवसांमध्ये वेगवगेळ्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.यामध्ये दीपक केसरकर, संजय शिरसाट यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घ्यावी असे भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे भाजपा नेत्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे नवीन मुख्यमंत्री कोण? याबद्दलची उत्सुकता कायम आहे.
- Advertisement -