Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर आज यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; शक्ती दुबे देशात पहिली..

अखेर आज यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; शक्ती दुबे देशात पहिली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-भारतातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजेच यूपीएससी.परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थी जीवाचे रान करून नशीब अजमावू पाहतात.यंदाच्या यूपीएससी २०२४ चा निकाल आज,मंगळवारी २२ एप्रिलला जाहीर करण्यात आला असून यंदाच्या यूपीएससी परीक्षेत उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथील शक्ति दुबे हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे,तर हर्षिता गोयल देशात दुसरी तर महाराष्ट्राच्या पुणे येथील अर्चित डोंगरे याने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) २०२४ च्या नागरी सेवा परीक्षामध्ये नियुक्तीसाठी एकूण १,००९ उमेदवारांची निवड केली आहे.या उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा (IAS),भारतीय परराष्ट्र सेवा (IFS),भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि इतर केंद्रीय सेवा (गट अ आणि ब) या पदांवर नियुक्त केले जाईल.निवडलेल्या उमेदवारांमध्ये विविध श्रेणीतील उमेदवारांचा समावेश आहे,ज्यामध्ये सामान्य श्रेणीतील ३३५,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS), ३१८ इतर मागासवर्गीय (OBC),१६० अनुसूचित जाती (SC) आणि ८७ अनुसूचित जमाती (ST) यांचा समावेश आहे.तर दिव्यांग श्रेणीतून ४५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज,मंगळवारी जाहीर झाला असून निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!