Wednesday, August 12, 2026
Homeगडचिरोली२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या समोरील मार्लीवार यांच्या मोकळ्या जागेत आज,रविवार ३ मे रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.हरबचनसिंग खन्ना सिंग पटवा वय २४ वर्षे, रा.गोकुळनगर,गडचिरोली असे मृतक तरुणाचे नाव असून मृतदेहाची पाहणी दरम्यान तरुणाच्या नाक,तोंड आणि गुप्तांगातून रक्तस्त्राव झाल्याचे निदर्शनास आल्याने हत्येचा संशय बळावला आहे.
आज सकाळच्या सुमारास कसरत(व्यायाम) करणाऱ्या काही मुलांना मोकळ्या जागेत एकजण झोपलेल्या अवस्थेत दिसून आला.जवळ जाऊन पाहिले असता चेहऱ्यावरील रक्त आणि कुठलीही हालचाल होत नसल्याने नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले,यावेळेस सदरचा प्रकार लक्षात आला. ओळख पटताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत हत्येचा संशय व्यक्त केला आहे.गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.विशेष म्हणजे, मृतक तरुणाची दुचाकी चावी लावलेल्या स्थितीत जवळच असल्याने शंका-कुशंका वाढीस लागली आहे. प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाची कठोर कारवाई; मुख्याध्यापक व दोन वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल.. – आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने गंभीर...

२० हजाराची लाच घेतांना वनक्षेत्र सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात; तर उपस्थित दोन वनरक्षकही ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राच्या राजुली सहवन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या परसटोला येथील राउंड ऑफिसमध्ये गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)पथकाने २० हजाराची...

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!