Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीसिरोंचा वन विभागातील अवैध सागवान तस्करीवर घातला जाणार आळा  - तस्करी रोखण्यासाठी...

सिरोंचा वन विभागातील अवैध सागवान तस्करीवर घातला जाणार आळा  – तस्करी रोखण्यासाठी आंतरराज्यीय(महाराष्ट्र-तेलंगाना) समन्वय सभा संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- अवैध सागवान तस्करीवर व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी ६ एप्रिल २०२३ रोजी सिरोंचा वनविभागा अंतर्गत विभागीय कार्यालय येथील प्राणहिता सभागृहमध्येआंतरराज्यीय (महाराष्ट्र- तेलंगाना) समन्वय सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.तस्कर महाराष्ट्रातील सागवान माल अवैध वृक्षतोड करुन गोदावरी नदीपात्रातुन तेलंगाना राज्यात पाठवित असतात आणि तोच सागवान माल उचलून तेलंगानीत तस्कर रस्ता मार्गे त्याची इतरत्र ठिकाणी विक्री करित असतात.त्यामुळे सागवान तस्करीवर आळा घालणे गरजेचे असल्यामुळे सिरोंचा वनविभागाचे पुढाकारातुन,आंतरराज्यीय (महाराष्ट्र-तेलंगाना) समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले. 

समन्वय सभेमध्ये अवैध सागवान तस्करीवर चर्चा आणि तस्करीवर आळा घालण्यासाठी दोन्ही राज्यांनी मिळून उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन अधिकारी यांनी केले.तसेच गुप्त बातमीचे जाळे पसरवून दोन्ही राज्यातील वनकर्मचारी यांचे व्हॉट्सप ग्रुप तयार करुन ज्या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होते; त्या मार्गावर सागवान तस्करी रोखण्यासाठी वनकर्मचारी यांचे संयुक्त गस्त मोहीम राबविण्याबाबत सभेमध्ये चर्चा करण्यात आली.तसेच अवैध सागवान तस्करी रोखण्यासाठी स्थानिक लोकांकडून वनकर्मचारी यांना कोणत्या प्रकारच्या समस्या येतात आणि त्या समस्या सोडविण्याकरिता कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करावयाचे आहेत,याबाबत सुध्दा चर्चा करण्यात आली. 

तसेच सभेमध्ये श्रीमती बी.लावण्या IFS District Forest officer,जयशंकर भुपालपल्ली (T.S) यांनी महाराष्ट्रातुन तस्करी होवून कुठे-कुठे सागवान माल लपवून ठेवला जावू शकतो; अशा सर्व ठिकाणाची माहिती त्यांनी दिली.तसेच अवैध वाहतुक होणार नाही, याकरिता तेलंगानाच्या बाजुला जे चोरवाटांचे रस्ते आहेत; अशा रस्त्यांवर वनउपज तपासणी नाक्याची निर्मीती करण्यात येईल याबाबत सांगीतले.

आंतरराज्यीय समन्वय सभेमध्ये तेलंगानातील श्रीमती बी.लावण्या IFS District Forest officer, जयशंकर भुपालपल्ली (T.S) तसेच सी.वज्रारेड्डी, FDO,श्रीमती एम.कमला RFO,व्येकंटेश्वर राव RFO आणि वनपाल व वनरक्षक उपस्थित होते.तसेच सिरोंचा वनविभागातील श्रीमती पूनम पाटे IFS उपवनसंरक्षक सिरोंचा वनविभाग सिरोंचा, पी.एम.पाझारे वपअ सिरोंचा,आर.एम.तोकला वपअ

आसरअल्ली  चिलकर, वपअ विशेष सेवा आसरअल्ली आणि वनपाल व वनरक्षक असे दोन्ही राज्यातील मिळून एकूण ५० अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.असे उपवनसंरक्षक सिरोंचा वनविभाग, सिरोंचा पूनम पाटे यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!