Saturday, October 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशिक्षकांच्या ड्रेसकोड बाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना….-आता शिक्षकांनाही मिळणार प्रतिष्ठेचे संबोधन

शिक्षकांच्या ड्रेसकोड बाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना….-आता शिक्षकांनाही मिळणार प्रतिष्ठेचे संबोधन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- समाजात, जनमाणसांत डाक्टरांना ज्या प्रमाणे डॉक्टर असे प्रतिष्ठतेचे संबोधन म्हणून ओळख असते, त्याप्रमाणे आता शिक्षकांनाही अशी ओळख मिळाली आहे.गुरू,शिक्षक हा श्रेष्ठच असतो त्यांना आदराचे श्रद्धेचे स्थान असते आता ही ओळख शब्द रूपात शिक्षकांच्या नावामध्येही संबोधित केली जाणार असून शिक्षकांच्या नावापुढे टीआर असे प्रतिष्ठतेचे संबोधन असणार आहे.राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहराव तसेच संबोधन ओळख याबाबत संदर्भात मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. यामध्ये शिक्षकांसाठी पेहरावाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. महिला शिक्षकांनी साडी,चुडीदार-सलवार,कुर्ता,दुपट्टा अशा पद्धतीने तर पुरुष शिक्षकांनी शर्ट,ट्राउझर पँट, शर्ट इन करून पेहराव करावा; शाळेने शिक्षकांसाठी एकच ड्रेसकोड, रंग निश्चित करावा, योग्य अशी पादत्राणे असावीत, वैद्यकीय कारण असल्यास पुरुष, महिला शिक्षकांना बूट घालण्यातून सवलत द्यावी, स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचाच पेहराव असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

प्रतिष्ठेचे संबोधन……

पीएचडी, डॉक्टर, वकील यांना त्यांच्या नावापूर्वी विशिष्ट शब्दाने संबोधण्यात येते. त्याचप्रमाणे आता शिक्षकांना त्यांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत दी.तर मराठी भाषेत टी,असे संबोधन लावण्यास राज्य शासनाने मुभा दिली आहे. यासंदर्भातील लोगो अर्थात बोधचिन्ह शिक्षण आयुक्तांकडून निश्चित केले जाणार आहे.हे संबोधन व लोगो शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!