Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीयांना म्हणतात खरे 'लोकसेवक'..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या बाहेर पडण्यास तयारच नाहीत.काहीजण केवळ खुर्चीवर बसून डेंगे हाकण्यात धन्यता मानतात.पण,या सर्वांना अपवाद म्हणून गडचिरोली जिल्हाधिकारी यांचे नाव पहिल्या पसंतीत उतरू लागले आहे.विशेष म्हणजे,ज्या जिल्ह्याचा बॉस कार्यतत्पर,निष्ठावान,ॲक्शनधारक असेल,अश्या जिल्ह्याचे चित्र नक्कीच बदलणार,यात कसलीही शंका नाही.अश्या लोकसेवकांची गडचिरोली जिल्ह्याच्या प्रत्येक विभागात गरज आहे.अश्यातच गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चोवीस तास दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे की नाही,याची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी बुधवारच्या मध्यरात्री गडचिरोलीजवळील चातगाव आरोग्य उपकेंद्राला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भेट देऊन सखोल पाहणी केली.
रात्रीच्या वेळी एखादा रुग्ण किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आरोग्य कर्मचारी किती तत्परतेने प्रतिसाद देतात,उपलब्ध सुविधा कशा कार्यरत आहेत आणि नागरिकांना आवश्यक उपचार वेळेत मिळतात का,याची प्रत्यक्ष पडताळणी करणे हा या भेटीमागील मुख्य उद्देश होता.भेटीदरम्यान उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला.उपचारासाठी आलेल्या एका जोडप्याशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेबाबतही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माहिती घेतली.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य व साथीच्या आजारांचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन उपकेंद्रातील औषधसाठ्याची सविस्तर तपासणी करण्यात आली.ताप,अतिसार,सर्दी,मलेरिया आदी आजारांवरील आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे का,याची खात्री करण्यात आली.तसेच मलेरिया निदानासाठी आवश्यक असलेल्या आरडीके किट्सची उपलब्धता,त्यांचा साठा आणि वापराची तयारी याचीही पाहणी करण्यात आली.
यावेळी उपकेंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या,त्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा,उपलब्ध मनुष्यबळ,सेवा वितरणाची कार्यपद्धती तसेच विविध शासकीय नोंदवही,रजिस्टर, रेकॉर्ड बुक्स व इतर दप्तर अद्ययावत ठेवण्यात आले आहे की नाही,याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली.आवश्यक नोंदी नियमित व अद्ययावत ठेवण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम,उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी अशा अचानक तपासण्या पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!