Sunday, June 21, 2026
Homeगडचिरोलीमालवाहू रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यु; देसाईगंज च्या राखीव वनातील आजची घटना...

मालवाहू रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यु; देसाईगंज च्या राखीव वनातील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मालवाहू रेल्वेच्या धडकेत ४ वर्षीय मादी वाघाचा मृत्यु झाल्याची घटना आज,१२ ऑगस्ट रोजी देसाईगंज-वडसा वनविभागांतर्गत वडसा परिक्षेत्रातील उपक्षेत्र वडसा नियतक्षेत्रातील एकलपूर कक्ष क्रमांक-९७ (राखीव वन)मधील अरूणनगर गावानजीक बल्लारपूर-गोंदिया मालवाहू रेल्वेने धडक दिल्याने सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान घडली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी,पशु वैद्यकिय अधिकारी डॉ.कुंदन पोडचलवार,पशु वैद्यकिय अधिकारी (वन्यजीव) टीटीसी ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर,दिपक पी.मेडीकुंटावार,सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त,डॉ. मृणाल टोंगे,पशुवैद्यकिय अधिकारी,वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले.मोका स्थळाची पाहणी केली असता सदर वाघ मृतावस्थेत आढळून आला.मृत वाघाचा मोकास्थळी पंचनामा नोंदवून मृत वाघाला वडसा परिक्षेत्रातील वडसा येथील रोपवाटिकेत आणण्यात आले.त्यानंतर पशु वैद्यकिय अधिकारी व त्यांच्या चमुने मृत वाघाचे शव विच्छेदनाची प्रक्रिया पुर्ण केली.मृत वाघाचे सर्व अवयव असल्याचे आढळून आले.पंच यांचे उपस्थितीत तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकारणाचे नियमानुसार मृत वाघाला जाळून नष्ट करण्यात आले. संपुर्ण शरीर नष्ट होईपर्यंत सर्व अधिकारी व पंच मोक्यावर उपस्थित होते.
सदरची कार्यवाही धर्मवीर सालविठ्ठल उपवनसंरक्षक (प्रा) वडसा यांचे मार्गदर्शनाखाली मनोज चव्हाण, उपविभागीय वन अधिकारी कुरखेडा,विजय धांडे, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) वडसा,एम.जी.मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव वडसा,पशु वैद्यकिय अधिकारी डॉ.कुंदन पोडचलवार,पशु वैद्यकिय अधिकारी (वन्यजीव) टीटीसी ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर,दिपक पी.मेडीकुंटावार,सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त,टीएमव्हीपी वडसा,डॉ.मृणाल टोंगे, पशुवैद्यकिय अधिकारी,अनिल दशहरे,प्रतिनिधी एनटीसीए यांचे उपस्थितीत व वडसा परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी कऱ्हाडे,तिजारे क्षेत्रसहाय्यक,अजय मराठे,आरआरटी व गजभिये वनरक्षक,भोजराम भुरकुंडे वनरक्षक,वाहन चालक मनन शेख,वडसा वनविभाग वडसा यांचे सहकार्याने पार पडली असल्याचे वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी कळविले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!