Monday, September 28, 2026
Homeअमरावतीमाझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महीलेकडून पैसे घेणे तलाठ्याला पडले महागात…-तलाठी निलंबित…

माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महीलेकडून पैसे घेणे तलाठ्याला पडले महागात…-तलाठी निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

अमरावती :- ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरू झाल्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी महिलांनी पहिल्या दिवसापासूनच तहसील कार्यालयात गर्दी केली.पण या योजनेच्या नावाखाली काही जण अर्जदार महिलांची लूट करीत असल्याचा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

अमरावती जिल्ह्यातल्या वरूड येथे अर्जदार महिलांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी तलाठी तुळशीराम कंठाळे याला निलंबित करण्यात आल्याची घटना काल,मंगळवारी दिनांक- २ जुलै रोजी घडली.

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजना’ एक जुलैपासून सुरू केली.या योजनेसाठी २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला पात्र असून याकरिता तलाठी कार्यालय तसेच शहरी भागात तहसील कार्यालयात आणि कृउबासमध्ये अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे.वरूड येथे या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तुळशीराम कंठाळे हा तलाठी चक्क महिलांकडून पैसे वसूल करीत असल्याचे समोर आले आहे.महिलांकडून पैसे उकळतानाचा त्याचा व्हिडीओ आणि फोटोदेखील व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली.

जिल्ह्यातील सर्व तहसील आणि तलाठी कार्यालयात कागदपत्रांसाठी महिलांची गर्दी झाली आहे. सकाळपासूनच महिला येथे रांगा लावून असतात. आता त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यात इतरही भागत महिलांची आर्थिक लूट होत असल्याची शंका येत आहे.

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ ही योजनेंतर्गत महिलांना लाभ मिळावा असा उद्देश असताना या योजनेसाठी लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याच्या प्रतापाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली.यामुळेच त्या तलाठ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील...

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!