Tuesday, August 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबाकीच्यांना तीन हजार दिले आणि आम्हाला कां नाही? - पात्र लाडक्या बहिणींना...

बाकीच्यांना तीन हजार दिले आणि आम्हाला कां नाही? – पात्र लाडक्या बहिणींना चिंता; तुम्हालाही मिळणार तीन हजार रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे रखडलेला असतांनाच नुकताच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात १२ मे व १४ मे २०२६ रोजी जमा करण्यात आला होता.मात्र,सदरचा हप्ता हा सर्वच पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नसल्याची बाब समोर आली होती.अश्यातच आता ज्या उर्वरित महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले नव्हते अश्यांना काल,शुक्रवार २२ मे पासून बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.याबाबत अनेक महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा संदेश धडकल्याने चिंता करण्याची गरज नाही.
एकाच गावात राहतो,एकाच योजनेचे फॉर्म भरले, केवायसी पण पूर्ण आहे.मग इतर महिला लाभार्थ्यांचे दोन हप्ते दिले,मग आमचेच का रखडले?असा संतप्त सवाल काही लाडक्या बहिणींनी प्रशासनाला विचारला आहे.फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रवर्गातील महिलांना हप्ते वेळेवर मिळाले.मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये इतर प्रवर्गातील बहुतेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.मात्र,काही पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे जमा झालेच नाही.बाकीच्यांना दिले आणि आम्हाला वगळले त्यामुळे आमची मोठी कुचंबणा होत आहे.एका गावात,एकाच योजनेत भेदभाव का? प्रशासनाने तातडीने तांत्रिक अडचण दूर करून थकीत दोन्ही हप्ते खात्यात जमा करावेत,अशी मागणी पात्र लाभार्थी महिलांनी केली आहे.विशेष म्हणजे,योजनेत पात्र असूनही काही महिलांना लाभ न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे, शासनाने यावेळेस मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन हप्ते देतेवेळी प्रवर्गवारीनुसार पाठवले.जसे की,सुरुवातीला ओबीसी,एसटी व नंतर एससी महिलांना लाभ देण्यात आला आणि बाकीच्यांना तीन हजार दिले आणि आम्हाला कां नाही?अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही,तर संपूर्ण पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे थेट तीन हजार रुपये जमा होणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!