Saturday, June 27, 2026
Homeगडचिरोलीबांधकामाची ई-निविदा एकाची तर बांधकामे दुसऱ्याची...- शासकीय बांधकामातील प्रकार ....

बांधकामाची ई-निविदा एकाची तर बांधकामे दुसऱ्याची…- शासकीय बांधकामातील प्रकार ….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली:- जिल्ह्यातील बाराही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शासकीय बांधकामे सुरू असून कामांवर एक आगळा-वेगळा प्रकार हल्ली दिसून येत आहे.शासकीय बांधकामांची ई-निविदा परवानाधारक कंत्राटदार टाकतो तर बांधकामावरील मलाई खाण्याचे काम नामधारी ठेकेदार करीत असल्याने बांधकामाची ई-निविदा एकाची तर बांधकामे दुसऱ्याची असे दिसून येत असल्याने शासकीय बांधकामातील भोंगळ कारभार चर्चेचा विषय ठरु लागला आहे.

शासनाच्या वतीने कितीही पॉश प्रणाली आणण्याचा प्रयत्न केला तरी समोरची व्यक्ती शक्कल लढवून त्यावर तोडगा काढण्यासाठी बुद्धीचा पुरेपूर वापर करून सत्तर तिथे बहात्तर लावून घेतो.अशाच प्रकारची स्थिती हल्ली निर्माण झाली आहे.कित्येक शासकीय कामांमध्ये पैसा फेको तमाशा देखो असे होत आहे.ज्यांच्याकडे कंत्राटदारांचा परवाना नाही असेही कार्यकर्ते स्वतःला कंत्राटदार असल्याचे इतरांना भासवून शासकीय यंत्रणेच्या तिजोरीवर डल्ला मारीत आहेत.त्यामुळेच शासकीय कामे झकास ऐवजी भकास होतांना दिसून येतात.यावर आळा घालणे गरजेचे आहे.अन्यथा मलाई खाण्यावर जास्तीत जास्त भर पडून बांधकामे निकृष्ट दर्जाची झाल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!