Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीबँक व शासकिय यंत्रणांनी समन्वयाने कर्ज प्रस्ताव मंजुर करावे - तृणाल फुलझेले...

बँक व शासकिय यंत्रणांनी समन्वयाने कर्ज प्रस्ताव मंजुर करावे – तृणाल फुलझेले यांचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्हा आकांक्षित व नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने लाभार्थी निवड, कर्ज मंजुरी व वाटप याकरिता बँक व शासकिय यंत्रणा यांनी समन्वयाने काम करुन उद्दीष्टपूर्ती करावी व त्यासाठी प्रत्येक आठवडयात आढावा बैठक घ्यावी, असे आवाहन जिल्हा विकास प्रबंधक, नाबार्ड, गडचिरोली तृणाल फुलझेले यांनी केले. जिल्हाधिकारी, संजय मीणा,यांनी जिल्हा कार्यबल समितीमध्ये सुचित केलेप्रमाणे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत कर्ज प्रस्ताव करताना आवश्यक प्रकल्प अहवाल तयार करणे व ताळेबंद वाचन याविषयीची एक दिवसीय कार्यशाळा आर.सेटी. प्रशिक्षण केंद्र, हॉल बँक ऑफ इंडिया, कॉम्पलेक्स,गडचिरोली येथे दिनांक 19 जानेवारी,2023 रोजी जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ व नाबार्ड,गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करणेत आली होती. या कार्यशाळेस जिल्हा बँक समन्वय, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळ चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यशाळेची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर अतुल पवार, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. विक्रांत गेडाम, सहा.प्रबंधक, स्टेट बँक गडचिरोली यांनी प्रकल्प अहवाल करताना प्रामुख्याने वापरणा-या तांत्रिक मुद्यावर सखोल मार्गदर्शन केले व ताळेबंद वाचनाबाबत महत्वाची माहिती सांगीतली. श्री कांबळे, मुख्य व्यवस्थापक (कर्ज) स्टेट बँक यांनी कर्ज मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती सांगीतली, श्री सोरते सरव्यवस्थापक (कर्ज) गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी कर्ज मंजुर करतानाच्या बँकेचे दृष्टीकोण व उद्योजकांनी उत्पादन किंमत निश्चित करताना अंतर्भात करणेच्या मुद्दे याबाबत माहिती दिली. श्री गजानन माद्यसवार, प्रबंधक विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांनी सकारात्मक दृष्टीकोन व ग्राहक अनुभव याबाबत मार्गदर्शन केले व बँक व जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामधील समन्वयाबाबत भूमिका मांडली.
त्यानंतर अतुल पवार, महाव्यवस्थापक यांनी ऑन लाईन प्रकल्प अहवाल व कर्ज मागणी अर्ज याबाबत प्रात्यक्षिक दिले. यामध्ये श्री गेडाम, निरीक्षक, खादी ग्रामोद्याग मंडळ यांनी सहाय्य केले. त्यानंतर सचिन देवतळे यांनी योजनेबाबत मार्गदर्शन केले.व उपस्थितांना मान्यवरांचे हस्ते डायरी वाटप करणेत आली. सदर कार्यक्रमाचे संयोजन श्री घुमारे,मेश्राम खेडेकर,टेकाम,गोतमारे,गेडाम यांनी केले होते.व शेवटी महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र,गडचिरोली यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!