Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील दहाव्या सत्रात मिलिंद खोब्रागडे व संतोष कपाले विजयी

नाट्यश्री कविता स्पर्धेतील दहाव्या सत्रात मिलिंद खोब्रागडे व संतोष कपाले विजयी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.या उपक्रमाचे दहावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३० कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून स्पर्धेचे हे दहावे सत्र असल्याने यावेळी दोन कवींना सन्मानित करण्यात आले आहे.त्यात गडचिरोली येथील नवोदित कवी  मिलिंद खोब्रागडे व रायगाव (जि. बुलढाणा ) येथील शेतकरी कवी संतोष कपाले या  दोन कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांच्या अनु. “बाईपण लय भारी” व “आनंदात जगू या ” या कवितांची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

मिलिंद खोब्रागडे हे गडचिरोली येथील नवोदित कवी असून ते विविध संस्थातर्फे अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत, तर संतोष कपाले हे रायगाव (तालूका – लोणार सरोवर, जिल्हा- बुलढाणा) येथील रहिवासी आहेत.आजवर त्यांनी शेती व निसर्ग या विषयांवर कवितांचे लेखन केलेले आहे. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.

 दहाव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने विलास जेंगठे, संजय बन्सल, मुर्लीधर खोटेले,कृष्णा कुंभारे ,संतोष  कपाले, गणेश रामदास निकम,चरणदास वैरागडे,  मनिषा हिडको,तुळशीराम उंदीरवाडे,पी.डी.काटकर, पुरुषोत्तम दहिकर,पुरुषोत्तम लेनगुरे,जयराम घोंगडे, प्रेमिला अलोणे,रेखा दिक्षित,माधुरी अमृतकर,वंदना मडावी,लता शेंद्रे,प्रशांत गणवीर,प्रभाकर दुर्गे,वसंत चापले, प्रतिभा सुर्याराव, बाबाजी व्ही.हुले,उपेंद्र रोहनकर,खुशाल म्हशाखेत्री,मिलींद खोब्रागडे,सुनील मंगर, सुजाता अवचट,स्वप्नील बांबोळे, ज्योत्स्ना बन्सोड इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!