Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोलीनाटककार चुडाराम बल्हारपुरे समाजगौरव पुरस्काराने सन्मानित…-झाडीपट्टीतील नाट्यसेवा व साहित्य सेवेबद्दल मिळाला पुरस्कार……

नाटककार चुडाराम बल्हारपुरे समाजगौरव पुरस्काराने सन्मानित…-झाडीपट्टीतील नाट्यसेवा व साहित्य सेवेबद्दल मिळाला पुरस्कार……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

 गडचिरोली :-आदिम युथ फाऊंडेशन,नागपूर या संस्थेतर्फे गेल्या अठरा वर्षांपासून दरवर्षी समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना,समाजगौरव,समाजरत्न,समाजयोध्दा व रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या पुरस्काराचे हे १९ वे वर्ष आहे.अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्काराकरीता यावेळी राज्यभरातील १६ मान्यवर व एका संस्थेची निवड करण्यात आली.   

यावेळी जैन भवन,गांधीबाग,नागपूर येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष आदिवासी संघर्ष समितीचे संयोजक विश्वनाथ आसई यांच्या हस्ते चंद्रभान पराते (माजी आयुक्त,महाराष्ट्र शासन,नागपूर),प्रमुख अतिथी धनंजय धापोडकर, आदिमचे संपादक प्रकाश निमजे,सौ.अनिता पराते, किर्तीकुमार पराते,देवराम नंदनवार,रामाजी नंदनवार,  ट्रस्टचे अध्यक्ष भाऊराव पारखेडकर,विनायक वाघ, ओमप्रकाश पाठराबे इ.मान्यवरांच्या हस्ते या वर्षातील पुरस्कृत मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या झाडीपट्टीतील नाट्यसेवेबद्दल व साहित्य सेवेबद्दल तसेच सध्या शासन स्तरावरून सुरू असलेल्या त्यांच्या “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” व “धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” या नाट्यकृतींच्या यशाबद्दल समाजगौरव पुरस्काराने शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिद्ध कवी प्रकाश दुलेवाल व विनायक वाघ यांनी केले.चुडाराम बल्हारपुरे यांच्या “गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकाला यावर्षी कंथेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील साहित्य संमेलनात साहित्य प्रेरणा पुरस्काराने तसेच एग्रोन्युज परिवार फलटण (जिल्हा सातारा) या ट्रस्टतर्फे धर्मवीर संभाजी महाराज साहित्य प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले  असून “धरती आबा – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” या नाटकाला साहित्यसेवा प्रज्ञामंच, पुणे चा पुरस्कारही जाहीर करण्यात आला आहे. 

चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,प्रा.यादव गव्हाणे,दादा चुधरी,डॉ.प्रा. श्याम मोहरकर,डॉ.प्रा.जनबंधू मेश्राम,डॉ.प्रा.योगीराज नगराळे,डॉ.प्राराजकुमार मुसणे,प्रा.नवनीत देशमुख (साहित्यिक),मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक),आदिवासी साहित्यिक तसेच विविध संस्था,साहित्यिक,कवी, व पत्रकार मित्रांनी अभिनंदन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!