Sunday, October 25, 2026
Homeगडचिरोलीदुचाकीचा वेग कमी करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात.. -पती जागीच ठार तर...

दुचाकीचा वेग कमी करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात.. -पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी; दुपारची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील दर्शनी चक गावा नजीक दुचाकीचा वेग कमी करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन,यात मोरेश्वर दादाजी सातपुते वय ६० वर्षे रा.चामोर्शी, जि.गडचिरोली हे जागीच ठार झाले तर पत्नी सुमन मोरेश्वर सातपुते वय ५५ वर्षे ह्या गंभीर जखमी झाल्याची घटना आज,बुधवार २३ एप्रिलला दुपारच्या सुमारास घडली.
माहितीनुसार,मोरेश्वर सातपुते हे धानोरा तालुक्यातील
केरोडा येथे दुचाकीने पत्नीला आणण्यासाठी गेले होते.पत्नीला घेऊन येत असतांना गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील दर्शनी चक गावा नजीक दुचाकीचा वेग पाणी पिण्यासाठी कमी करीत असतांनाच मोरेश्वर सातपुते यांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रोलिंगला दुचाकी धडकली.दुचाकी रोलिंगला धडकताच मोरेश्वर सातपुते रोलिंगलाच लटकून राहिले.त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाल्या.सदरची घटना नागरिकांच्या निदर्शनास येताच गडचिरोली पोलिसांना पाचारण करण्यात आले.पोलिसांनी मृतदेह तसेच जखमी महिलेस तात्काळ गडचिरोली सामान्य रुग्णालयात दाखल केले.घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!