Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीतृतीयपंथीयांच्या तक्रारी निवारण समितीवर सदस्यत्वासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीयांच्या तक्रारी निवारण समितीवर सदस्यत्वासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्यातील तृतीयपंथीयाच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करणेबाबतचा मुद्दा तिस-या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे.तृतीयपंथी,ट्रॅासजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असुन या घटकास समाजाकडुन सापत्न व भेद भावाची वागणुक दिली दिली जाते.नेहमीच भेदभाव,सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासुन दुर्लक्षित राहिलेला आहे.त्यामुळे या समाज घटकांचे शासना मार्फत मुलभुत अधिकारांचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.तृतीय-२०१८ प्र.क्र.२६/सामासु दि. ०७ ऑक्टोंबर २०२० अन्वये जिल्हयातील तृतीयपंथीय यांच्या तक्रारीचे,समस्यांचे जिल्हास्तरावर तक्रार निवारण होणे आवश्यक आहे.या करीता जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे.सदर जिल्हास्तरीय समितीवर सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक एक व्यक्तीची नेमणुक करावयाची आहे.यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणा-या इच्छुक संबंधित व्यक्तीनी १७ मार्च २०२३ रोजी पर्यत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय समितीवर सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती सदस्यांची नव्याने समावेश करुन समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे.त्याकरीता सामाजिक क्षेत्रात काम करणा-या इच्छुक व्यक्तींनी, गडचिरोली जिल्हातील संबंधीत व्यक्तीनी अर्ज करण्याकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,एल.आय.सी.ऑफिस रोड आयटीआय चौक गडचिरोली 442605 या पत्त्यावर किंवा कार्यालयाचा संपर्क क्र. 07132-222192 वर संपर्क साधावा.असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!