Friday, October 16, 2026
Homeहिंगोलीतलाठी च्या खून प्रकरणी आरोपीस अटक.. - दिवसभर कामकाज ठप्प; दोषीला फाशीची...

तलाठी च्या खून प्रकरणी आरोपीस अटक.. – दिवसभर कामकाज ठप्प; दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
हिंगोली :-जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील तलाठी संतोष पवार खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस कडक शिक्षा द्यावी; या मागणीसाठी महसूल विभागाच्या सर्व संघटनांनी आज, गुरुवारी २९ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर निदर्शने केली.त्यामुळे जिल्ह्यातील महसुल विभागाचे कामकाज ठप्प झाले होते.
आडगाव रंजेबुवा साजाचे तलाठी संतोष पवार यांचा बोरीसावंत येथील आरोपी प्रताप कराळे याने काल, बुधवारी दुपारी कार्यालयातच डोळ्यात मिरचीपूड टाकून खून केला.या प्रकरणी तलाठी बालाजी डवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला.हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक संजय केंद्रे,जमादार महेश अवचार, भारशंकर यांच्या पथकाने प्रताप यास जवळाबाजार येथून अटक केली.
दरम्यान,या घटनेच्या निषेधार्थ जिल्हयातील विविध महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन घोषणाबाजी केली.या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत उपाय योजना करावी; अशी मागणी करण्यात आली.तसेच खूनाचा योग्य तपास करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा व दोषीला फाशीची शिक्षा द्यावी;अशी मागणी संघटनांनी केली आहे.
जिल्हाभरात महसूल संघटनेच्या आंदोलनामुळे पाच तहसील कार्यालयासह तीन उपविभागीय अधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले होते.एकही महसूल कर्मचारी कार्यालयाकडे फिरकलाच नाही.त्यामुळे काही ठिकाणी तर कार्यालयातील अनेक विभाग कुलुपबंद होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!