उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) व कल्पतरु बहुउद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ३०० गरजू, होतकरू तरुणांना ६० दिवसांचे पोलिस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती रायुकाँ जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर व कल्पतरुचे अध्यक्ष कृणाल पडलवार यांनी दिली आहे.सदर प्रशिक्षणात अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.सकाळी ५.३० ते ७.३० शारीरिक क्षमता चाचणी प्रशिक्षण व सकाळी १० ते १२ व सायंकाळी ६ ते ८ वाजता लेखी परीक्षा चाचणी मार्गदर्शन वर्ग चालणार आहे.सदर प्रशिक्षण ६० दिवसांचे असून यामध्ये शारीरिक क्षमता चाचणीसोबतच मराठी व्याकरण,अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी,जनरल नॉलेज आदी विषय शिकविले जाणार आहेत. दर रविवारी सराव पेपर घेतले जाणार आहे.

