Wednesday, October 7, 2026
Homeनाशिकटोमॅटोचे निकृष्ट बियाणे प्रकरणी ग्राहक तक्रार निवारण मंचाचा दणका - शेतकऱ्यास १...

टोमॅटोचे निकृष्ट बियाणे प्रकरणी ग्राहक तक्रार निवारण मंचाचा दणका – शेतकऱ्यास १ लाख ३० हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नाशिक :- टोमॅटोचे बियाणे निकृष्ट दर्जाचे दिल्याने ऐन हंगामात टोमोटो फळ आले नाही.त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले.शेतकऱ्याने बियाणे कंपनी आणि वितरकासह कृषी अधिकाऱ्याच्या विरोधात ग्राहक न्यायमंचात तक्रार केली होती.न्यायालयाने बियाणे कंपनीला १ लाख २० हजार नुकसान भरपाई आणि वितरक दुकानदाराला १० हजार रुपये शारीरीक मानसिक त्रासापोटी देण्याचे आदेश दिले.

ग्राहक न्यायमंचाने दिलेल्याय निकालानुसार, बाळासाहेब वडजे रा.तळेगाव वणी ता.दिंडोरी यांनी क्लाॅज सिड्स प्रा.लि कंपनीचे टोमॅटो बियाणे जुन्नरे बदर्स ऍग्रो प्रा. लि. पिंपळगाव बसवंत यांच्याकडून १० ग्रॅम वजनाचे ३ पिकिटे यांच्याकडून ३३०० रुपयांना बियाने खरेदी केले होते.

बियाणे रोपे तयार करुन ६० आर क्षेत्रात लागवड केली होती.पिकांची सर्व आवश्यक ती काळजी घेतली योग्य निगा राखली मात्र टोमॅटो च्या झाडांमध्ये नर जातीचे झाडांची संख्या अधिक असल्याने फळांना कळी लागली नाही. याबाबात बियाने विक्रेता आणि कृषी अधिकारी पंचायत समिती यांना कळविण्यात आले. मात्र त्यांनी या तक्रारीकदे दुर्लक्ष केले. बियाने तक्रार निवारण समितीने क्षेत्रात पहाणी मध्ये योग्य किड नियोजन असल्याने प्रादूर्भाव झालेला नसून नर जातींच्या झाडांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आले होते.यामुळे पिकाच्या उत्पादनात ८५ टक्के घट येण्याची शक्यता होती.त्यावेळी १५०० ते १७०० रुपये प्रिती कॅरेट उत्पन्न मिळाले असते.२५० बाजार भावाप्रमाणे किमान ४ लाख ७५ हजार रुपये उत्पन्न मिळाले असते.मात्र सदोष बियाणामुळे पिक नष्ट झाले. संबधीत कंपनी आणि वितरकांकडून नुकसान भरपाई मिळण्याकरीता ग्राहक न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

न्याय मंचाचे अध्यक्ष मिलिंग सोनवणे, सदस्य सतीन शिंपी, प्रेरणा काळुंखे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकूण घेत बियाने कंपनीने तक्रारदार शेतकरी यांना १ लाख २० हजार नुकसान भरपाई द्यावी बियाने विक्रेता दुकानदाराने शारीरीक मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये द्यावे असे आदेश दिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये देशात प्रथम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.कृषी...

राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाचा सर्पदंशाने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ)जवानाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत...

कोरची तालुक्यातील सीताफळ-जांभूळ उत्पादनाला चालना देण्यासाठी रोपवाटिका,प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारावे.. -आमदार रामदास मसरामांची कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व जांभूळ या फळपिकांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी तालुक्यात अद्ययावत रोपवाटिका,शेतकरी...

मंत्रिमंडळ निर्णय; आता पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ योजना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावतांना जोखीम पत्करून केलेल्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्याच्या योजनेस आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!