Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीजिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली करण्याची मागणी-निवडणूक आयोगाकडे काँग्रेस कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष...

जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली करण्याची मागणी-निवडणूक आयोगाकडे काँग्रेस कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी केली तक्रार….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली करावी; अशी मागणी काँग्रेस कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी ३ मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली.

दुर्गम भागातील वेंगपूर, सुरगाव, अळंगेपल्ली तसेच पडकाटोला या चार गावांना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना कडक शब्दात फटकारले आहे. पेसा कायद्याची अंमलबजावणीकडे दुर्लक्ष, कथित धान घोटाळ्यात दोषींना पाठिशी घातल्याचे प्रकरण, उद्योगांच्या नावाखाली जमीन संपादन करताना दडपशाही यामुळे जिल्हाधिकारी मीणा हे वादात सापडले असल्याचा दावा करत शेडमाके यांनी त्यांच्या बदलीची मागणी केली आहे.विशिष्ट लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील म्हणून ते ओळखले जातात; त्यामुळे लोकसभा निवडणुका पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी त्यांची बदली गरजेची असल्याचे शेडमाके यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!