Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीच्या किरण चौधरी ठरल्या 'महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४' च्या मानकरी…

गडचिरोलीच्या किरण चौधरी ठरल्या ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४’ च्या मानकरी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-नुकतेच डॉ.बाबा साहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मंगळवार पेठ पुणे येथे सिने आर्क प्रोडक्शन व रुद्रांश फाऊंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर विनोद खैरे नागपूर-मुंबई याच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात अभूतपूर्व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महाराष्ट्रातील १०१ जणांची ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४’ साठी निवड करण्यात आली. यामध्ये गडचिरोलीच्या नवेगाव कॉम्प्लेक्स येथील निवासी किरण महादेवराव चौधरी ह्या ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४’ च्या मानकरी ठरल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रातील नामवंत सामाजिक संस्था,कला क्षेत्र,क्रिडा क्षेत्र, सांस्कृतिक, गायन क्षेत्र,वादन,नृत्य, लेखक,कवी, कवयत्री,नामवंत किर्तनकार,तसेच पत्रकारीता इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीमत्वांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.सदर पुरस्कारासाठी राज्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते.त्यानुसार निवड समितीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १०१ जणांची ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४’ साठी निवड करण्यात आली.

गडचिरोलीच्या किरण चौधरी ह्या ‘देश बचाव पुरुष बचाव’ च्या चंद्रपूर संघटनेत कार्यरत आहेत.या संस्थेतर्फे २०२२ मध्ये त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.खैरे कुणबी रणरागिणी मंचतर्फे रणरागिणी समाजभूषण पुरस्कार मिळाले आहे.महिलांनी संघटित व सक्षम व्हावे; याकरीता विविध कार्यक्रम आयोजित करीत असतात.

देशन्नती मनस्विनी तर्फे उत्कृष्ट कवियित्री पुरस्कार तसेच स्वयंसिद्ध ज्ञानसिंधू,सिंधू महिला विश्व संभाजीनगर येथे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातून पहिल्या महिला मानकरी आहेत.अनेक ऑनलाईन कवीसंमेलन तसेच आयोजिका राहिल्या आहेत.झाडीबोली साहित्य मंडळ महिला दिनी त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.अनेक सत्कार त्यांच्या नावे आहेत.त्यांचे ‘त्रिवेणीचा संगम’ हे पाहिले पुस्तक प्रकाशित झालेले आहे.सामजिक कार्यात सक्रिय असून कोरोना योद्धा म्हणून रणरागिणी मंचतर्फे पुरस्कार मिळाला आहे.आतापर्यंत केलेल्या भरीव कार्याची दखल घेत त्यांना ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!