Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. - रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात...

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी वनविभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.मात्र काही नागरिक रानटी हत्तींचे फोटो,व्हिडिओ शुट करून सोशल मीडियाच्या ‘रील्स’ साठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत.या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक आर्या व्हि.एस.यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
  • रील आणि फोटोंच्या नादात नियमांचे उल्लंघन👇
हत्तींच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी, ‘प्रायमरी रिस्पॉन्स टीम’ आणि ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ दिवस-रात्र परिसरात गस्त घालत आहेत.यासोबतच, हत्तींच्या स्थानाबाबतची आणि हालचालींची अचूक माहिती गावकऱ्यांना सातत्याने दिली जात आहे, जेणेकरून नागरिक सतर्क राहू शकतील.मात्र काही उत्साही लोक या माहितीचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे.वनविभागाने सुरक्षेच्या कारणास्तव उभारलेले बॅरिकेड्स(कठडे)ओलांडून काही नागरिक थेट हत्तींच्या जवळ जाण्याचा धोका पत्करत आहेत. रानटी हत्तींचे फोटो काढणे,व्हिडिओ बनवणे आणि सोशल मीडियासाठी ‘रील्स’ तयार करणे या नादात अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत.
  • वनविभागाचे आवाहन आणि इशारा👇
उपवनसंरक्षक,गडचिरोली वनविभाग आर्या व्हि.एस. यांनी नागरिकांना आवाहन करतांना म्हटले आहे की, “वनविभाग करत असलेले सर्व प्रयत्न आणि उपाययोजना या केवळ आणि केवळ सामान्य नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आहेत.त्यामुळे सर्व नागरिकांनी वनविभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे.कोणत्याही परिस्थितीत हत्तींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका.”
तसेच,परिसरात हत्ती दिसून आल्यास किंवा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन अशा संवेदनशील परिस्थितीत जबाबदारीने वागावे,अशी अपेक्षा वनविभागाकडून व्यक्त केली जात आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी भेंडेकर यांनी देखील रात्रीच्या वेळी जंगलालगतच्या भागात किंवा हत्तीच्या वावराच्या परिसरात विनाकारण जाणे टाळावे, वन्यप्राणी आक्रमक होणार नाही अशा प्रकारे सुरक्षित अंतर राखावे, गर्दी करू नये आणि हत्ती दिसल्यास किंवा त्याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!