Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील आणखी सहा मार्ग पुरामुळे बंद…-चिचडोह बॅरेज चे ३८ पैकी ३८...

गडचिरोली जिल्ह्यातील आणखी सहा मार्ग पुरामुळे बंद…-चिचडोह बॅरेज चे ३८ पैकी ३८ गेट उघडले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-आज जिल्ह्यात एकूण सरासरी ७९.२ मि.मी.पाऊस झालेला आहे.४० पैकी २३ मंडळामध्ये अतिवृष्टी ची नोंद झालेली असुन धानोरा तालुक्यातील मुरुमगाव मंडळामध्ये सर्वाधिक १५६.४ मि.मी.पावसाची नोंद आहे.गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी २७ गेट उघडलेले असुन ३,०३३ क्युमेक्स (१,०७११४ क्युसेक्स)विसर्ग आहे.चिचडोह बॅरेज चे ३८ पैकी ३८ गेट उघडलेले असुन विसर्ग ३८०४ क्युमेक्स (१,३४३४५ क्युसेक्स) आहे.गोसीखुर्द धरणातील विसर्ग ५ हजार क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे.देसाईगंज(वडसा),वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.मात्र,नदीची पाणी पातळी वाढत आहे.आज जिल्ह्यात २४ तासाकरीता पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट दिलेला असून काही ठिकाणी फ्लॅश फ्लड रिस्क चे संकेत दिले आहेत.

आज पुरामुळे बंद झालेले मार्ग👇

१) आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड

२) अहेरी मोयाबिनपेठा  रस्ता वट्रा नाला ता. अहेरी 

३) कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता ता. कुरखेडा

४) आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलांकर्जी ते रेपनपल्ली भाग) ता.अहेरी

५)  जारावंडी ते राज्यसिमा भाग ता.धानोरा

६) पोर्ला वडधा रस्ता ता.कुरखेडा

७) वैरागड जोगिसाखरा शंकरपुर चोप कोरेगाव रस्ता ता.देसाईगंज(वडसा)

८) कुरखेडा वैरागड ता.कुरखेडा 

९) करवाफा पोटेगाव रस्ता

१०)मालेवाडा खोब्रामेंढा रस्ता ता.कुरखेडा 

११) गोठनगाव सोनसूरी रस्ता ता.कुरखेडा 

१२)देसाईगंज नवरगाव आंधळी चिखली रस्ता ता. देसाईगंज

१३) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला

१४)आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्ल कोटा नदी)

इशारा👇

नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक नद्या व नाले तसेच वैनगंगा,प्राणहिता,वर्धा, गोदावरी व इंद्रावती या मुख्य नद्यांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.तसेच हवामान विभागातर्फे जिल्ह्यात काही ठिकाणी फ्लॅश फ्लड रिस्क चे संकेत दिलेले असल्याने नदी काठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी तसेच नदी पात्रात आवागमन करु नये; असे जिल्हा प्रशासनाने कळविण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!