Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात सरासरी ७०.६० टक्के मतदान.. - सर्वात जास्त मतदान आरमोरी नगरपरिषदेत.

गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ७०.६० टक्के मतदान.. – सर्वात जास्त मतदान आरमोरी नगरपरिषदेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नगरपरिषद निवडणूक-२०२५ अंतर्गत आज,मंगळवार २ डिसेंबरला आरमोरी,देसाईगंज आणि गडचिरोली नगरपरिषदेत शांततेत मतदान पार पडले असून जिल्ह्यात सरासरी ७०.६० टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे.यात आरमोरी नगरपरिषद मतदार संघात ७२.८५ टक्के,देसाईगंज ७२.४८ तर गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रात ६८.२६ टक्के मतदान झाले आहे.
आरमोरी मतदारसंघात ११ हजार ७९२ पुरुष आणि ११ हजार २०७ महिला असे एकूण २२ हजार ९९९ मतदार होते.त्यापैकी ८ हजार २७१ पुरुष आणि ८ हजार ४८४ महिला असे एकूण १६ हजार ७५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
देसाईगंज मतदारसंघात एकूण १२ हजार ७६३ पुरुष मतदार व १३ हजार ५८९ महिला असे एकूण २६ हजार ३५२ मतदार होते.यातील ९ हजार ४४९ पुरुष मतदार व ९ हजार ६५२ स्त्री मतदार असे एकूण १९ हजार १०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गडचिरोली नगरपरिषद मतदारसंघात एकूण २१ हजार १६७ पुरुष मतदार,२२ हजार ३४३ महिला व ३ तृतीयपंथी असे एकूण ४३ हजार ५१३ मतदार होते. यातील १४ हजार ५९३ पुरुष मतदार,१५ हजार १०७ महिला मतदार तर २ तृतीयपंथी असे एकूण २९ हजार ७०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यात एकूण ४५ हजार ७२२ पुरुष मतदार,४७ हजार १३९ महिला आणि ३ तृतीयपंथी असे एकूण ९२ हजार ८६४ मतदार होते.त्यापैकी ३२ हजार ३१३ पुरुष, ३३ हजार २४३ महिला व २ तृतीयपंथी असे एकूण ६५ हजार ५५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!