Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्याच्या जांगदा ग्रामसभेची गरुड झेप…-ग्रामसभेने २० हे.आर.क्षेत्रात बांबू रोपवन करण्याचा घेतला...

गडचिरोली जिल्ह्याच्या जांगदा ग्रामसभेची गरुड झेप…-ग्रामसभेने २० हे.आर.क्षेत्रात बांबू रोपवन करण्याचा घेतला निर्णय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जांगदा (बु.)येथील गावकऱ्यांनी मिळून सामुहिक वन हक्क प्राप्त जमिनीवर अख्खा कायदाच उतरवून आणला आहे.आपण नेहमीच ऐकत असतो की, ‘ऐक्य हेच सामर्थ्य’ हीच संकल्पना मनी बाळगून एक्कीमुळे सर्वकाही सहजरित्या शक्य करता येऊ शकते; याचे साधे उदाहरण गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जांगदा ग्रामसभेने महाराष्ट्रासमोर ठेवले आहे.सामुहिक वन हक्क प्राप्त धानोरा तालुक्यातील जांगदा (बु.) ग्रामसभाद्वारे बांबू रोपवनाची सुरवात करण्यात आली.या कामाचे उद्घाटन काल,शुक्रवार दिनांक- २१ जून २०२४ रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते पार पडले. 

महाराष्ट्रातील सर्व ग्रामसभेसाठी योग्य उदाहरण निर्माण करणाऱ्या जांगदा(बु.)या ग्रामसभेने एकूण २० हे.आर.क्षेत्रात बांबू रोपवन करण्याचे निर्णय घेतले असून १० हे.आर.क्षेत्रावर ६,५०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे.त्यानुसार अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.ग्रामसभेच्या माहितीप्रमाणे, जंगलातील ५ हे.आर.क्षेत्र पुर्वीपासून ‘देवराई’ म्हणून आरक्षित आहे आणि तो पुढेही असणार आहे.

जिल्हा प्रशासन गडचिरोली आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात सुरु असेलेल्या एकल ग्रामसभा सक्षमिकरण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षित ग्रामसभेला मानव विकास मिशन अंतर्गत गोडाऊन बांधकाम करणे २०२२-२३ या योजने अंतर्गत १०० मेट्रिक टन क्षेमतेचे गोडाऊन मंजूर करण्यात आले आहे.ग्रामसभेने स्वतः बांधकाम पूर्ण करून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

आयुषी सिंह यांनी सदर कार्यक्रमादरम्यान ग्रामसभेला संबोधित करतांना म्हटले की,ग्रामसभा रोहयो अंतर्गत बांबू लागवड व फळबाग लागवड अशा निरंतर उत्पादन वाढीचे रोजगार देणारी कामे घेण्याचे निर्देश दिले व पुढील कामांसाठी ग्रामसभेला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान चेतना लाटकर,नोडल अधिकारी एकल सेंटर यांनी अतिशय कुतूहलाने ग्रामसभेचे अभिनंदन करून ग्रामसभेने प्रशिक्षणाचे योग्यरित्या अंमलबजावणी केल्या बद्दल आनंद व्यक्त केला आणि इतर सर्व ग्रामसभांनी यातून प्रेरणा घेत या ग्रामसभेच्या पाऊला मागे पाऊल ठेवून ३० नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्याणाच्या मदतीने अनेक विकास कामांची सुरुवात ग्रामसभेत करण्याचे आवाहन केले.  गडचिरोली जिल्ह्यातील अश्या अनेक  सक्षम ग्रामसभा निर्माण होतील असा आशावाद व्यक्त करण्यात आला. 

यावेळी सदर कार्यक्रमासाठी व ग्रामसभेला अधिक मार्गदर्शन व सहकार्य करण्याकरिता उपमुख्यकार्यकारी अधिकारी भुयार तसेच  उपजिल्हाधिकारी रोहयो गडचिरोली साळुंखे यांनी पाठींबा दर्शविला तसेच या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती लोखंडे तहसीलदार,टीचकुले  बीडीओ,श्रीमती मसराम (इंजिनिअर), सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती ग्रामसभा जांगदा (बु.)चे सर्व सदस्य आणि गावातील शासकीय कर्मचारी वृंद तसेच एकल सेंटर टीम यांनी प्रयत्न केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!