Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांचे खत लिंकिंग करणाऱ्या वितरकांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश..

गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांचे खत लिंकिंग करणाऱ्या वितरकांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात काही प्रमुख खत वितरक चढ्या दराने खतांची विक्री करत असल्याच्या आणि खत लिंकिंग करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर  जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अशा वितरक आणि संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी खत कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच मोठे आणि लहान वितरक यांच्यासोबत जिल्ह्यातील खतांची उपलब्धता आणि वितरणाचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक गोकूल,सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन,रणजित यादव,नमन गोयल आणि कृषी अधीक्षक प्रीती हिरळकर प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात खतांची उपलब्धता सुरळीत राहावी याची दक्षता घेण्याचे आणि शेतकऱ्यांची पिळवणूक खपवून घेतले जाणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी अवंटीत केलेले खत पूर्णपणे याच जिल्ह्यात उपलब्ध झाले पाहिजे आणि ते इतरत्र जिल्ह्यात वळविण्यात आल्यास कारवाईच्या सूचना दिल्या.खतांची सध्याची मोठी मागणी लक्षात घेता, बफर स्टॉकमधील खत तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.शेतकऱ्यांवर मागणी नसतांनाही अनावश्यक इतर वस्तू खरेदी करण्याची सक्ती करू नये,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच खत कंपन्यांनी खतांच्या रॅक कधी लावल्या जातील,याची पूर्वसूचना प्रशासनाला द्यावी,असेही निर्देश त्यांनी दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!