Thursday, June 25, 2026
Homeउमरेडक्षुल्लक कारणावरून मुलाने स्वतःचाच गळा विळ्याने कापला…-मृत अर्थची अवस्था बघून पोलिसही गहिवरले

क्षुल्लक कारणावरून मुलाने स्वतःचाच गळा विळ्याने कापला…-मृत अर्थची अवस्था बघून पोलिसही गहिवरले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

उमरेड(नागपूर) :-आपला मुलगा शिकून खूप मोठा व्हावा; आई- वडिलांचे नाव मोठे करावे; अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते.मुलांसाठी रात्रंदिवस जीवाचे रान करून शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतात.अशातच अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यास आई – वडील टोकत असतात.असाच प्रकार उमरेड मद्ये घडलेला आहे. मुलाला रात्रंदिवस मोबाइल पाहण्याचा छंद होता.इयत्ता दहावीत मुलगा चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाल्याने,वडिलांनी त्याला काही दिवसांपूर्वी मृत अर्थ म्हैसकर ला नवीन मोबाइलसुद्धा घेऊन दिला.शिक्षण, अभ्यासाकडे दुर्लक्ष करीत असलेल्या मुलाला आईवडिलांनी रागावले.केवळ या क्षुल्लक कारणाने त्याने भाजी कापायच्या विळ्याने (पावशी) स्वतःचाच गळा कापला.अर्श महेंद्र म्हैसकर वय १६ वर्षे,रा. बोटेझरी,ता.भिवापूर हल्ली मुक्काम उमरेड बसस्थानकाच्या मागे असे मृताचे नाव आहे.मृतक अर्श हा स्थानिक जीवन विकास कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी विज्ञानचा विद्यार्थी होता.

अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या आणि शांत स्वभावाच्या अर्शने अशा पद्धतीने टोकाचा निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपविल्याने सर्वांनाच धक्का बसला.अर्शला इयत्ता दहावीत ८७ टक्के गुण होते. मृतक अर्शचे वडील ट्रकचालक आहेत.मुलाने चांगली टक्केवारी मिळवल्याने त्यांनी विपरीत परिस्थितीतही 

त्याला मोबाइल घेऊन दिला.अर्शने अभ्यासाकडे दुर्लक्ष करीत,मोबाइलच्या अतिआहारी गेला.याबाबत आईवडील त्याला रागावले.गुरुवारी वडील महेंद्र हे ‘अभ्यास का करीत नाही,’ यावरून त्याला रागावले होते.केवळ या क्षुल्लक कारणाचा राग अर्शने मनात ठेवला. काल,शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्वछतागृहात आंघोळीसाठी अर्थ गेला.बराच वेळ झाल्यानंतरसुद्धा तो बाहेर निघाला नाही. आईवडिलांनी त्याला आवाज दिला.कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वडील महेंद्र म्हैसकर यांनी दरवाजा तोडला.अर्श रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत निपचित पडून होता.धारदार विळ्याने स्वतःच्याच गळ्याला त्याने चिरले होते.उमरेड पोलिस ठाण्यात कलम १९४ बी.एन.एस.एस.प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे करीत आहेत.

मृत अर्थची अवस्था बघून पोलिसही गहिवरले👇

वडील महेंद्र म्हैसकर यांनी दरवाजा तोडताच अर्थ रक्ताच्या थारोळ्ळ्यात,गळा चिरलेल्या अवस्थेत होता. बाजूलाच विळा पडून होता.स्वच्छतागृहात अंघोळीसाठी गेलेल्या अर्थच्या सभोवताल रक्ताचा सडा पडलेला होता.हे दृश्य बघून आईवडिलांनी हंबरडा फोडला.मृतावस्थेत पडलेल्या आपल्या मुलाला बघून मातापित्यांनी आरडाओरड सुरू केली.लागलीच शेजारी गोळा झाले.पोलिस यंत्रणाही पोहोचली.मृत अर्थची अवस्था बघून पोलिसही गहिवरले.मृत्यू इतका भयंकर असू शकतो,असा विचार सुन्न करून गेला. रक्ताने माखलेले स्वच्छतागृह आणि अर्थची अवस्था बघण्यासारखी नव्हती.अर्शच्या आत्महत्येच्या या अशा निर्णयामुळे सारेच घाबरले.हतबल झाले.अस्वस्थ झालेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!