Wednesday, October 28, 2026
Homeगडचिरोली'काम नाही कवळीचा अन् लाभ उचलतो बांधकाम कामगाराचा..!' -पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित...

‘काम नाही कवळीचा अन् लाभ उचलतो बांधकाम कामगाराचा..!’ -पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बांधकाम कामगार योजने अंतर्गत शासन स्तरावरून पात्र लाभार्थी बांधकाम कामगारांना विविध आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ दिला जातो.यात आर्थिक लाभाच्या योजना असल्याने अनेक उचभ्रू परिवारातील महिला,पुरुष व तरुणांनी एकही दिवस कामावर गेले नसतांना दलालामार्फत अधिकचे पैसे देऊन बांधकाम मजुराचे बोगस प्रमाणपत्र मिळवीत ‘काम नाही कवळीचा अन् लाभ उचलतो बांधकाम कामगाराचा..!’ असे निदर्शनास येऊ लागले आहे.यात अनेकांकडून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे बांधकाम मजुराची नोंदणी केली जात आहे.नोंदणीच्या आधारे अनेक आर्थिक लाभाच्या योजना उचलत असून शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम केले जात आहे.परिणामी,पात्र बांधकाम कामगार लाभार्थी योजनेपासून वंचित राहत असल्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सामाजिक सुरक्षा,आर्थिक,शैक्षणिक,आरोग्य यासह अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळवून देणे,कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे,रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे,हा महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मंडळाचा मुख्य उद्देश आहे.बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये एखाद्या कंत्राटदारांकडे किंवा कामाच्या इतर ठिकाणी वर्षभरात कमीत कमी ९० दिवस काम केले असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत,नगरपरिषद किंवा महानगरपालिकेचे बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.मात्र,सद्यःस्थितीत ग्रामपंचायतीच्या सचिवांकडून प्रमाणपत्र देणे बंद आहे.अशा स्थितीत एकही दिवस कामावर न गेलेले उचभ्रू परिवारातील लोकांनी आर्थिक लाभाच्या योजनेसाठी दलालामार्फत बनावट प्रमाणपत्र जोडून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली व अनेक योजनांचा लाभ घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मागील वर्षभरात नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांनी नोंदणीसाठी जोडलेल्या कागदपत्रांची जिल्हास्तरावरून चौकशी केल्यास अनेक बोगस बांधकाम कामगार मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कंत्राटदारकडे कामगार एकही दिवस बांधकामावर नसतांनाही अनेक कंत्राटदारांनी आर्थिक लोभापायी बांधकाम कामगाराच्या फॉर्मवर स्वाक्षरी दिलेल्या आहेत.नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराच्या फॉर्मची तपासणी करून स्वाक्षरी असलेल्या कंत्राटदाराच्या कामावरील मस्टरची चौकशी केल्यास अनेक कंत्राटदारसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!