Friday, October 9, 2026
Homeगडचिरोलीऐन सणाच्या दिवशी २१ वर्षीय युवकाचा नदीत बुडून मृत्यू... - गडचिरोली जिल्ह्यातील...

ऐन सणाच्या दिवशी २१ वर्षीय युवकाचा नदीत बुडून मृत्यू… – गडचिरोली जिल्ह्यातील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-ऐन सणाच्या दिवशी २१ वर्षीय युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवार १ नोव्हेंबरच्या सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.तेजस राजू बोम्मावार वय २१ वर्षे, रा.वांगेपल्ली,ता.अहेरी,जि.गडचिरोली,असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,राजू बोम्मावार याचे वांगेपल्ली येथे हार्डवेअरचे दुकान आहे.त्यांना दोन मुले आहेत.मोठा मुलगा तेजस हा पुण्यात एमबीएचे अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता.दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तो गावीआला होता.आज सकाळी तो काही मित्रांसह प्राणहिता नदीवर आंघोळीला गेला होता.परंतु आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर नागरिकांनी नदीकडे धाव घेतली.पोलिस निरीक्षक स्वप्नील इज्ज्पवार हेही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले.पोलिस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीने तेजसचा शोध घेतला.परंतु, दुपारपर्यंत त्याचा मृतदेह आढळून आला नाही.ऐन दिवाळीच्या दिवशी बोम्मावार कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी रिट याचिका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात...

माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘व्हील्स ग्लोबल फाउंडेशन’शी सामंजस्य करार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील माता,अर्भक आणि लहान बालकांचे पोषण सुधारण्यासाठी तसेच कुपोषण प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया...

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!