Tuesday, August 25, 2026
Homeबिहारएका रेस्टॉरंटला मसाला डोसा सोबत सांबर न देणे पडले महागात.....- जिल्हा ग्राहक...

एका रेस्टॉरंटला मसाला डोसा सोबत सांबर न देणे पडले महागात…..- जिल्हा ग्राहक आयोगाने ३५०० रुपये ठोठावला दंड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

बिहार :- बिहारच्या बक्सर घाटात वास्तव्यास राहणारे मनीष गुप्ता पेशाने वकील असून १५ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांचा वाढदिवस व त्या दिवशी गणेश चतुर्थीचाही योग होता.त्यानिमित्ताने त्यांची आई व परिवारातील सदस्यांना त्रास होऊ नये; याकरिता रेस्टॉरंट या ठीकानाहून काहीतरी घरपोच ऑर्डर करून खावे; अशी त्यांची इच्छा झाली.त्यानुसार त्यांनी नमक रेस्टॉरंट येथून मसाला डोसा ऑर्डर करून घरी नेला असता ऑर्डर चे पॉकीट उघडताच त्यात मसाला डोसा सोबत सांबर दिसून आले नाही.घरातील सदस्य व इतर पाहुणे त्यावर हसू लागल्याने दुसऱ्या दिवशी मनीष गुप्ता यांनी रेस्टॉरंट मॅनेजरला खडेबोल सुनावले असता मॅनेजरने उध्दटपणे उत्तर देऊन १४० रुपयांना तू सर्वच रेस्टॉरंट विकत घेशील काय? असे उत्तर दिले.

पेशाने वकील असलेल्या मनीष गुप्ता यांनी रेस्टॉरंट ला कायदेशीर नोटीस बजावल्या नंतरही कुठल्याही प्रकारचे प्रतिसाद न मिळाल्याने गुप्ता यांनी अखेर जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली व न्याय मिळण्याची दाद मागितली.त्यानुसार तब्बल ११ महिन्यांच्या कालावधी नंतर आयोगाने सर्व बाजू ऐकून गुप्ता यांच्या बाजूने जुलै २०२३ रोजी निकाल दिला व रेस्टॉरंटला दोषी ठरवून ग्राहकाला झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी ३५०० रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहे.४५ दिवसांत पैसे न दिल्यास ८% व्याजासह रक्कम वसूल करण्यात येणार असेही फर्मावीले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!