Monday, August 24, 2026
Homeगडचिरोली२० वर्षीय तरुणीची अज्ञात इसमाने राहत्या घरामध्येच केली हत्या....- सिरोंचा तालुक्यातील घटना...

२० वर्षीय तरुणीची अज्ञात इसमाने राहत्या घरामध्येच केली हत्या….- सिरोंचा तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथील ओलिता रामय्या सोयाम वय २० वर्षीय तरुणीची झोपेतच तिच्या राहत्या घरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ओलिता व तिची आई एका खोलीमध्ये झोपून होते तर ओलिताचा भाऊ बुचय्या दुसऱ्या खोलीमध्ये झोपलेला होता.रात्री सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असल्याची संधी अज्ञात इसमाने साधली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे.महत्वाचे म्हणजे ओलिता व तिची आई एकाच खाटेवर झोपले असतांना तिच्या आईला साधी कान-कुणही लागली नाही.सकाळच्या सुमारास भाऊ अंथरूण,पांघरूण घेऊन; आई व बहीण झोपलेल्या खोलीत नेऊन ठेवण्यास गेला असता खाटेच्या खाली रक्त पडलेला दिसताच आरडा ओरड केली व आईला उठवून बहिणीला उठविण्याचा प्रयत्न केला असता  ओलिताने कसलाही प्रतिसाद न दिल्याने सिरोंचा पोलिसांना घटनेची माहिती दिली.ओलिताच्या  हनुवटीवच्या खाली,गळ्यावर व मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले.दिलेल्या तक्रारीवरून सिरोंचा पोलीसांनी अज्ञात इसमा विरोधात भांदवी कलम ३०२ व ४४९ अन्वये गुन्हा दाखल केला.सदरची घटना गुरुवार जुलै २०२३ रोजी रात्रीची असून शुक्रवार जुलै २०२३ रोजी पहाटे उघडकीस आली.अज्ञात इसमाचा सिरोंचा पोलीस शोध घेत असल्याचे कळते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!