Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआधार कार्ड हरवले वा नंबर विसरलात तर पुन्हा मिळवता येणार..

आधार कार्ड हरवले वा नंबर विसरलात तर पुन्हा मिळवता येणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालय असो वा खासगी कामाकरीता,बँक खात्यापासून ते शैक्षणिक क्षेत्रात इतर दस्तऐवजांसह आधार कार्डला सगळीकडेच मोठे महत्व प्राप्त झाले आहे.आधार  कार्ड शिवाय कुठलेही काम हे अपूर्णच म्हणावे लागेल.
आधार कार्ड हे आजच्या घडीला एक आवश्यक दस्तऐवज बनले आहे.ते जर चोरी झाले किंवा कुठे हरवले,तर खूप अडचण येऊ शकते.जर तुम्हाला आधार नंबर आठवत नसेल,तर अशा परिस्थितीत  काय करावे किंवा कोणाची मदत घ्यावी; सुचेनासे होते.अशा वेळी तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाची(UIDAI) मदत घेता येते.सामान्यतः आधार नंबरच्या मदतीनेच हरवलेले किंवा चोरी झालेले आधार कार्ड पुन्हा मिळवता येते. पण,नंबर नसतांनाही आधार कार्ड रिकव्हर करता येते.कार्ड हरवले वा चोरी झाल्यास आधार नंबर शोधण्यासाठी ते मोबाइल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे.यासाठी सर्वप्रथम युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचा हेल्पलाइन नंबर १९४७ वर कॉल करा.नंतर तुमची माहिती, जन्मतारीख आदी तपशील भरा.यानंतर तुम्हाला नोंदणीचा नंबर दिला जाईल.या नंबरच्या मदतीने आधार नंबर शोधू शकता.तसेच UIDAI या वेबसाइटवर रिट्राइव्ह यूआयडी/इआयडी हा ऑप्शन दिसेल,त्यावर क्लिक करा.या दोघांपैकी एक पर्याय निवडून माहिती भरावी लागेल.आता मोबाईलवर आलेला ओटीपी आणि कॅप्चा कोड टाका.तुम्हाला एसएमएसद्वारे आधार नंबर मिळेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!