- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्रीय पद्धतीने सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाची अंतिम यादी आज,रविवार ८ जून रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. त्यानंतर दोन दिवस कोटा प्रवेश होणार असून ११ जून पासून प्रवेशाची पहिली फेरी सुरू होणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच दिवशी प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली.६ व ७ जून रोजी आक्षेप व तक्रारी नोंदविण्यात आल्यानंतर आज प्रवेशाची अंतिम यादी जाहीर होणार आहे.त्यानंतर ९ ते ११ तारखेपर्यंत अल्पसंख्याक व महाविद्यालयीन व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश केले जाणार आहेत.११ जूनपासून प्रवेशफेरी सुरू होणार आहे.
असे असणार वेळापत्रक👇
८ जून रोजी निवडलेल्या महाविद्यालयांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.तर ९ ते ११ जून रोजी अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश.१० जून रोजी विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांची माहिती जाहीर,११ ते १८ जून रोजी पहिल्या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश.२० जून रोजी दुसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया सुरू.
- Advertisement -

