Wednesday, October 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे पोलिसांना पडणार महागात..

आता वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे पोलिसांना पडणार महागात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात प्रलंबित ई-चालान वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.मात्र,या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी पोलीस वाहनचालकांना रस्त्यात अडवून ‘दंड आत्ताच भरा,अन्यथा वाहन किंवा कागदपत्रे जप्त करू’ अशी दमदाटी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पोलिसांच्या या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.अश्यातच आता रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चालान’ च्या दंडाची वसुली करतांना वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे आता पोलिसांना महागात पडणार आहे.प्रलंबित दंड भरण्यासाठी वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये,असे स्पष्ट निर्देश अप्पर पोलीस महासंचालक(वाहतूक)यांनी राज्यातील सर्व पोलीस घटकांना दिले आहेत.या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वाहतूक विभागाने ई-चलान दंड वसुलीसाठी यापूर्वीच ‘आदर्श कार्यप्रणाली’ (एसओपी) जाहीर केली आहे. यानुसार,जर वाहनचालक स्वेच्छेने दंड भरण्यास तयार असेल,तरच तो स्वीकारावा.वाहन जप्तीसारखी कारवाई केवळ न्यायालयाच्या आदेशानेच करण्यात यावी.रस्त्यात वाहनचालकांना अडवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलू नये,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्राउंडवर काम करणारे पोलीस कर्मचारी अनेकदा वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून जनतेला नाहक त्रास देत असल्याचे समोर आले आहे.यामुळे पोलिसांची जनमानसातील प्रतिमा मलिन होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.जे पोलीस अधिकारी किंवा अंमलदार या निर्देशांचे उल्लंघन करतील,त्यांच्याविरुद्ध तात्काळ शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!