Sunday, August 9, 2026
Homeगडचिरोलीआता लड्डू गोपालसारखा गोपालकाला फुटणे बंद.. गडचिरोली जिल्ह्यात बदलाचे वारे; अवैध मुरूम...

आता लड्डू गोपालसारखा गोपालकाला फुटणे बंद.. गडचिरोली जिल्ह्यात बदलाचे वारे; अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी प्रशासन ॲक्शन मोडवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मागील काही वर्षात गडचिरोली जिल्ह्यात ‘जे आले ते हात साफ करूनच गेले’,अशी म्हणण्याची वेळ आली होती.यापूर्वी ना चौकशी लागायची,ना कुणाला फुरसत मिळायची.सर्वजण आपल्याच धुंदीत मग्न असायचे.लड्डू गोपालसारखा गोपालकाला फुटायचा. मात्र,आता मागील काही महिन्यांपासून प्रशासन तात्काळ ॲक्शन मोडवर येत असल्याने काही कां असेना, जिल्ह्यात काही प्रमाणात तरी बदलाचे संकेत दिसून येऊ लागले आहेत.अश्याच प्रकारे ज्यांनी अवैध कामांमध्ये साथ दिली,अश्यांची आता उचलबांगडी होणार असल्याने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावणाऱ्यांची अवस्था पाहण्यालायक होणार आहे.त्यातच कोट्यवधी रुपयांच्या अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून आता वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी
उत्खनन करण्यात आलेल्या जागांची ईटीएस मशिनद्वारे म्हणजेच जमिनीची मोजणी करणाऱ्या उपकरणाद्वारे मोजणी करण्यात येणार असल्याने ‘वैध की अवैध’ याची खात्री होणार आहे व त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
नवीन रेल्वे मार्ग बांधकामासाठी मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन केल्याची तक्रार ग्रामपंचायत खांबाळा येथील
माजी सरपंच नंदकिशोर शेडमाके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.तक्रारीत पोर्ला महसूल मंडळ व वनपरिक्षेत्रातील पोर्ला,वसा,वसा चक येथील दोन्ही विभागांच्या जमिनीतून १० पोकलँड व ३० हायवाच्या माध्यमातून दररोज दिवस-रात्र हजारो ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.त्यानुसार सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी गंभीर प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपविभागीय अधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.उपविभागीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला.त्यानुसार आता उत्खनन करणाऱ्या कंपनीने रॉयल्टीच्या(स्वामित्व हक्क) प्रमाणात मुरुमचे उत्खनन केले की,त्यापेक्षा जास्तीचे उत्खनन केले,हे ईटीएस मशिनद्वारे उत्खनन झालेल्या जागांची मोजणी केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे येत्या काळात ‘ॲक्शन की रक्षण’ हे लवकरच कळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!