- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी ८५ वर्षावरील वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग मतदारांच्या गृहमतदानाने जिल्ह्यात आजपासून लोकशाहीच्या उत्सावाला सुरूवात झाली आहे.अहेरी मतदार संघात गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या सर्व ३८ मतदारांनी आज ८ नोव्हेंबरला मतदान केले.
अहेरी विधानसभा मतदारसंघातील सिरोंचा येथील किष्तय्या कोम्ममेरा,वर्धना मोदूत,चंद्रय्या बोंताला, अहेरीलतील जैयबुनिशा शेख,मुनिर मो.शेख,जोसेफ मिझ,यशोदाबाई रापरर्तीवार,एटापल्लीतून अंजानाबाई मोहुर्ले आणि नागोराव बेनगुरे,अहेरीच्या गुणप्रिया पाटील,अमर कामिलवार,मुलचेरा तालुक्यातील ९८ वर्षीय जगदीश फनीभूषण मित्र,८८ वर्षाच्या महिला मतदार बसंती विश्वास,३५ वर्षे वयाचा दिव्यांग मतदार सुमंत सुशील मंडल यांचेसह एकूण ३८ मतदारांनी गृहमतदानासोठी नोंदणी केली होती.या सर्व मतदारांनी आज मतदान केले.
अहेरी विधानसभा मतदार संघात आजपासून गृहमतदानाला सुरूवात झाली.आरमोरी विधानसभा मतदारसंघात उद्या दिनांक-९ सप्टेंबर पासून आणि गडचिरोली मतदार संघात १० सप्टेंबर पासून गृहमतदानाला सुरवात होत आहे.
आरमोरी मतदार संघात ८५ वर्षावरील १३८ मतदार तर दीव्यांग ७२ मतदार,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ८५ वर्षावरील ११७ तर दीव्यांग ४० मतदार आणि अहेरी विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील २२ तर दीव्यांग मतदार १६ असे जिल्ह्यात ८५ वर्षावरील एकूण २७७ मतदारांनी आणि १२८ दीव्यांग मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केली आहे.
लोकशाही प्रक्रीयेत सहभाग नोंदविणाऱ्या मुलचेरा तालुक्यातील मतदारांचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे व मतदान अधिकारी चमूने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
- Advertisement -

