Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीअप्रव भैसारे यांची माहिती अधिकार तथा पत्रकार संरक्षण समितीच्या कुरखेडा तालुकाध्यक्ष पदी...

अप्रव भैसारे यांची माहिती अधिकार तथा पत्रकार संरक्षण समितीच्या कुरखेडा तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सामाजिक कार्यकर्ते तसेच आंधळी ग्रामपंचायतचे उपसरपंच,प्रहार संघटनेचे प्रमुख, दिव्यांग लोकांचे सेवक तसेच रुग्णमित्र यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत.गडचिरोली सारख्या मागास व नक्षलग्रस्त क्षेत्रात कीतेक वर्षापासून दिव्यांग सेवक म्हणुन कार्यरत असलेले समाजसेवेचे वसा जोपासत,सामाजिक कार्याची आवड तसेच गोर गरिबांसाठी न्याय,हक्क,अधिकारासाठी नेहमी तत्पर असणारे,माहिती तंत्रध्यामध्ये प्राविण्य असलेला, उच्च   शिक्षित अभ्यासू व्यक्तिमत्व,दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी जीवन झोकून देणारे,कुणावरही
अन्याय,अत्याचार होऊ नये; याकरिता आजवर त्यांनी केलेले सामाजिक कार्य गुणवत्ता,संघटनात्मक आणि कार्यक्षमता,गरजू व्यक्तींना मदत,निस्वार्थ समाजसेवेचा परिचय व सामाजिक कार्याची दखल घेत माहितीचा अधिकार तथा पत्रकार संरक्षण समितीच्या कुरखेडा तालुकाध्यक्ष पदी अप्रव पुरंदर भैसारे यांची शिफारस समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज उराडे यांनी समितीच्या राज्य कार्यकारणी कडे केली होती.अशातच त्यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रातील योगदान व  समाजाच्या प्रती असलेली तळमळ पाहू जाता कुरखेडा तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती केल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज उराडे यांनी सांगीतले.महेश सारणीकर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या  कुरखेडा तालुकाध्यक्ष पदी अप्रव पुरंदर भैसारे यांची नियुक्ती यांची केली आहे.त्यांना समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज उराडे यांच्या हस्ते नुकतेच नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र दिले आहे.सामाजिक कार्य तथा जनतेप्रति असलेली तळमळ सतत सुरू ठेवत आणखी उत्तम कार्य करावे; अशी अपेक्षा बाळगून पुढील वाटचालीस अप्रव भैसारे यांना शुभेच्छा देत त्यांच्या या नियुक्ती बद्दल अभिनंदनाचा वर्षाव सर्वच स्तरातून केला जातो आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!