Sunday, August 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा..

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात अखेर वर्षाच्या अखेरीस नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये जमा करण्यात आले आहे.काल बुधवारी सायंकाळी अनेक महिलांच्या खात्यांत दीड हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे.विशेष म्हणजे,लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हफ्ते प्रलंबित होते.त्यामुळे वर्षअखेर एकत्रित रक्कम मिळेल,अशी आशा लाभार्थ्यांमध्ये होती.मात्र,शासनाने सध्या स्थितीत एकाच महिन्याची रक्कम जमा केली आहे.यामुळे अनेक महिलांचा अपेक्षाभंग झाला आहे. याआधी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळून तीन हजार रुपये मिळतील,अशी चर्चा होती.त्यातच जानेवारी महिन्याचाही हफ्ता एकत्र दिला जाईल आणि ४ हजार ५०० रुपये खात्यात जमा होतील,असा अंदाज बांधला जात होता.मात्र प्रत्यक्षात केवळ दीड हजार रुपये जमा झाल्याने महिलांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.वर्षाच्या शेवटी महागाईचा भार वाढलेला असतांना आणि घरगुती खर्च डोईजड झालेला असतांना,अपेक्षेपेक्षा कमी रक्कम मिळाल्याने काही लाडक्या बहिणी नाराज झाल्याचे चित्र आहे.विशेषतः डिसेंबर महिना पूर्ण संपत असतांना फक्त नोव्हेंबरचे पैसे मिळाल्याने सरकारकडून उर्वरित हफ्त्यांबाबत स्पष्टता कधी येणार,असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे.तरीही,किमान नोव्हेंबरचा हफ्ता खात्यात आल्याने अनेक महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाचखोर विभागीय वन अधिकाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ३१ जुलै रोजी जशी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली,तशीच...

आज २५० युवक-युवतींनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; गडचिरोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत(MY Bharat)यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'व्यसनमुक्त युवा- विकसित भारत संकल्प अभियान' अंतर्गत आज...

आता राज्यात अंमलात येणार धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६’.. -कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास सात वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात अनेक नागरिकांनी स्वतःचा धर्म बदलून दुसऱ्या धर्माचे स्वीकार केल्याचे,तसेच धर्म बदलल्यानंतरही मूळ धर्मातील लाभ घेण्याचा सपाटा चालवल्याचे...

अखेर ‘त्या’ आत्महत्येचे कारण आले समोर.. – दोन सख्ख्या भावांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव  टाऊन परिसरात गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी दोन सख्ख्या भावांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!