- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-सार्वत्रिक विधानसभा निवडणूक अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यात आज,शुक्रवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
आरमोरी विधानसभा मतदारसंघात रामदास मळूजी मसराम (इंडीयन नॅशनल काँग्रेस) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले.तर गडचिरोली विधानसभा मतदारसंघात डॉ.देवराव मादगुजी होळी (भारतीय जनता पार्टी) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.डॉ.होळी यांनी काल व आज असे एकूण दोन अर्ज दाखल केले आहेत.अहेरी विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.जिल्ह्यात आजपर्यंत पाच उमेदवारांकडून एकूण सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
आज २५ ऑक्टोंबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून ११ व्यक्तींनी ३२ नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून ४ व्यक्तींनी ८ अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून ६ व्यक्तींकडून ९ अर्जाची उचल करण्यात आली आहे.जिल्ह्यात चार दिवसात एकूण १८६ नामनिर्देश अर्जाची उचल झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आहे.
- Advertisement -

