Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीमुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ३ गॅस सिलेंडर मोफत नाही; तर आधी भरावे लागणार...

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ३ गॅस सिलेंडर मोफत नाही; तर आधी भरावे लागणार पैसे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थीच्या कुटुंबाला एका वर्षात ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत करून दिले जात आहे; परंतु अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर जोडणी कुटुंबातील पुरुषांच्या नावे असल्याची बाब समोर आली.त्यामुळे राज्य शासनाने त्यात बदल केला आहे. कुटुंबातील पुरुषांच्या नावे असणारी गॅस जोडणी त्याच घरातील महिलेने स्वतःच्या नावावर करून घेतल्यास मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे.राज्यातील लाभार्थीना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थीच्या कुटुंबाला एका वर्षात ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण (रिफील) मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे.एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल.तसेच फक्त १४.२ किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असल्याने जिल्ह्यातील अनेक महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थीच्या कुटुंबाला एका वर्षात ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत करून दिले जात आहे; असे शासन निर्णयात नमूद असले तरी महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार नाही.महिलांना आधी गॅस सिलिंडरसाठी जे काही पैसे लागतील,ते पैसे द्यावे लागतील.त्यानंतर केंद्र सरकारच्या ३०० रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन ५३० रुपये प्रतिसिलिंडर इतकी रक्कम लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जमा होईल.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रतिसिलिंडर ८३० रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येईल. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा व आधार मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!