Sunday, September 6, 2026
Homeलातूरतळीराम कंडक्टरचा अजब कारनामा...- प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यात सोडून कंडक्टर गेला दारू पिण्यासाठी

तळीराम कंडक्टरचा अजब कारनामा…- प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यात सोडून कंडक्टर गेला दारू पिण्यासाठी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

लातूर:-सरकारी बसच्या कंडक्टरचे अजब कृत्य समोर आले आहे.काल गुरुवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस कंडक्टरने दारू पिण्यासाठी प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या मधोमध सोडून पळ काढला.त्यामुळे अनेक तास बस तेथेच थांबली होती. सध्या कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे.ही घटना गुरुवारी सकाळी लातूर आणि उस्मानाबादमधील कळंब दरम्यान घडली. इकडे कंडक्टरने काटगाव येथे बस थांबवली आणि खाली उतरला.यानंतर तासाभराहून अधिक प्रतीक्षा केल्यानंतर बसमधील सुमारे ३८ प्रवाशांनी त्याचा शोध सुरू केला. बराच प्रयत्न केल्यानंतर तो एका दुकानात दारू पित बसलेला आढळून आला.आरोपी कंडक्टरवर कारवाई करण्यात आल्याची माहिती एमएसआरटीसी उस्मानाबाद विभागीय वाहतूक नियंत्रक यांनी दिली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला निलंबित करण्यात आले. ड्युटीवर असताना कंडक्टरने मद्य प्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!