- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी या नावाने आजपर्यंत ओळख होती.मात्र,दोन्ही पदे आता रद्द करण्यात आली आहेत.त्यामुळे यापुढे केवळ ‘ग्रामपंचायत अधिकारी’ या पदनामाने नवी ओळख या अधिकाऱ्यांना मिळाली आहे.सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयाचे ग्रामसेवक युनियने स्वागत केले.ग्रामपंचायतीला शासकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकच होती.मात्र,लहान ग्रामपंचायतीला काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामसेवक,सचिव तर मोठी ग्रामपंचायत सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामविकास अधिकारी असे पदनाम असायचे.परंतु,दोन्ही पदे एकच असल्याने तसेच वेतन व भत्ते सारखेच असल्याने ही पदे संभ्रम निर्माण करणारी होती.
त्यामुळे एकाच नावाने ही ओळख कायम करण्याची मागणी ग्रामसेवक युनियनने शासनाकडे केली होती. याची दखल शासनाने घेतली व ही दोन्ही पदे रद्द करून आता ग्रामपंचायत अधिकारी हे पदनाम कायम केले आहे.या निर्णयाचे ग्रामसेवक युनियने स्वागत केले आहे.
- Advertisement -

