Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा परिषदेतर्फे ८९ अनुकंपाधारकांची समुपदेशनाद्वारे नेमणूक..

गडचिरोली जिल्हा परिषदेतर्फे ८९ अनुकंपाधारकांची समुपदेशनाद्वारे नेमणूक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदांवर  अनुकंपा प्रतिक्षा यादीतील ८९ उमेदवारांना नेमणूक देण्यात आली आहे.यासाठी काल,१० सप्टेंबर रोजी गट-क व गट-ड मधील प्रतिक्षासुचीमधील उमेदवारांना त्यांची जेष्ठता,शैक्षणिक अर्हता व पदांचे उपलब्धतेनुसार समुपदेशन घेण्यात आले होते.
गट-क संवर्गात एकुण ५१ पदांवर तर गट-ड संवर्गात एकुण ३८ पदांवर अशी एकुण ८९ पदांवर जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे नेमणूका देण्याची कार्यवाही करण्यात आली.यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाची ८ पदे,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गाची १२ पदे,कनिष्ठ आरेखक संवर्गाचे १ पद,  कंत्राटी ग्रामसेवक संवर्गाची ५ पदे,कनिष्ठ व्याख्याता संवर्गाचे १ पद,अंगणवाडी पर्यवेक्षिका संवर्गाचे १ पद, आरोग्य सेवक (पुरुष) संवर्गाचे २१ पदे,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संवर्गाचे २ पदे,परिचर संवर्गाची ३६ पदे व चौकीदार संवर्गाची २ पदांचा समावेश आहे. अनुकंपाधारक उमदेवारांना त्यांनी समुपदेशनाद्वारे स्विकारलेल्या पदावरील नियुक्ती आदेश संबंधित विभागाकडुन शैक्षणिक अर्हता व कागदपत्र पडताळणी करुन देण्यात येतील.पेसा क्षेत्रात दिलेल्या नेमणुका संबंधित प्रकल्प अधिकारी यांचे पेसा प्रमाणपत्र ८ दिवसांत सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सदर समुपदेशानाची कार्यवाही जिल्हा परिषद गडचिरोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह (भा.प्र.से.)यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली व परिविक्षाधीन अधिकारी सिध्दार्थ शुक्ला (भा.प्र.से.), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) शेखर शेलार,यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली.समुपदेशन प्रक्रियेकरिता सहाय्यक प्रशासन अधिकारी फिरोज लांजेवार,कनिष्ठ प्रशासन अधिकारी रितेश वनमाळी, वरिष्ठ सहाय्यक अविनाश कुमरे व सामान्य प्रशासन विभागातील इतर कर्मचाऱ्यांचे सहाय्य लाभले; असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!