Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोलीव्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजने अंतर्गत प्रस्ताव आमंत्रित…

व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजने अंतर्गत प्रस्ताव आमंत्रित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत सन २०२४-२५ या सत्राकरीता व्यायामशाळा विकास अनुदान योजना,क्रीडांगण विकास अनुदान योजना व युवक कल्याण विषयक अनुदान योजनेअंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून १५ जुलै २०२४ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

तरुण पिढीमध्ये  व्यायामाची आवड निर्माण करुन शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन,प्रचार,प्रसार व जोपासणा करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत नविन व्यायामशाळा बांधकाम करणे या साठी अनुदान देण्यात येते.तसेच व्यायाम साहित्य (इनडोअर) व ओपन जिम (खुले व्यायाम साहित्य) साहित्याचा पुरवठा करण्यात येतो.

क्रीडांगण विकास अनुदान योजने अंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, २००/४०० मीटरचा धावणमार्ग तयार करणे,विविध खेळाची प्रमाणीत क्रीडांगणे तयार करणे,क्रीडांगणावर प्रसाधनगृहाचे बांधकाम करणे, भांडारगृह बांधणे,क्रीडांगणावर पाण्याची सुविधा निर्माण करणे,क्रीडांगणाभोवती भिंतीचे अथवा तारेचे कुंपन करणे इत्यादी बाबी तयार करण्याकरीता संबंधित शाळा/संस्थेस अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. 

सदर अनुदानाचा लाभ घेण्याकरीता जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा,अनुदानित माध्यमिक शाळा, महविद्यालये याशिवाय आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा तसेच ग्रामपंचायत,शासकीय यंत्रणा यांनी सदर योजनेचा लाभ घेऊन सुविधा निर्माण करण्याकरीता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव १५ जुलै २०२४ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावा.विशेषत: गावातील नागरीकांना शारीरिक कवायतीकरीता लाभ पोहचावा या उद्देशाने ग्रामपंचायतीने खुली व्यायामशाळा (ओपन जिम) चे साहित्य प्राप्त करुन घेण्याचे दृष्टीने विनाविलंब प्रस्ताव सादर करावा. 

या योजने संदर्भात अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी इच्छुक शाळा/संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतीक भवन,कॉम्पलेक्स,गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा; असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!