Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कने व्यक्ती केली शंका…ईव्हीएम मशीन होऊ शकते...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कने व्यक्ती केली शंका…ईव्हीएम मशीन होऊ शकते हॅक…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्ला आणि एक्सचे मालक एलन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.ईव्हीएम मशीन किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हॅक करता येऊ शकते; असे एलन मस्क यांनी x वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.मानवी हस्तक्षेपामुळे ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे.

एलन मस्क यांनी निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता वातावरण पेटल्याचे दिसत आहे. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांच्या विधानाला विरोध केला आहे.त्यांनी यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.त्यांनी हे एक अतिशय सामान्य विधान असल्याचे म्हटले आहे.असे कोणीही सुरक्षित डिजिटल हार्डवेअर बनवू शकत नसल्याचे राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.भारतीय ईव्हीएम कस्टम-डिझाइन केलेले,सुरक्षित आणि कोणत्याही नेटवर्कपासून वेगळे आहेत.ईव्हीएममध्ये ब्लूटूथ,वाय-फाय,इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार रॉबर्ट एफ.केनेडी जूनियर यांची पोस्ट शेअर करताना एलन मस्क यांनी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर लिहिले की,मानव आणि एआयच्या मदतीने मशीन हॅक होण्याचा धोका आहे.रॉबर्ट एफ केनेडी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पोर्तो रिकोमधील निवडणुकीदरम्यान ईव्हीएममधील अनियमिततेबद्दल लिहिले होते.त्यांनी पोर्तो रिकोच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित मतदानात अनेक त्रुटी समोर आल्याचे सांगितले होते.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ईव्हीएम मशीनचा वापर करत गैरप्रकार केल्याचा आरोप अमोल कीर्तिकर यांनी केला आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह  निर्माण झाले आहेत.यावर आता राहुल गांधी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी एलन मस्कची पोस्ट शेअर करत ईव्हीएम मशीनला ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणत विरोधकांवर टीका केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!